मुंबई -राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर अद्यापही सत्तास्थापन झालेली नाही. भाजप अजुनही सत्तास्थापनेचा दावा करत नसले तरी हालचाली मात्र तशा होत आहेत. यासाठी गुरुवारी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व आशिष शेलार हे दुपारी २ वाजता राज्यापालांची भेट घेणार आहेत.
भाजप कार्यालयातील परिस्थिती हेही वाचा - माझ्या मदतीने पुढे आलेल्यांनी पाठीत खंजिर खुपसला; आज 'ते'ही अडचणीत
दरम्यान, भाजप सत्ता स्थापनेचा दावा करत असले तरी त्यांच्या कार्यालयात शुकशुकाट आणि कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह दिसत आहे. कार्यालयातील कार्यकर्त्यांची अनुपस्थिती मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. याच परिस्थितीचा भाजप प्रदेश कार्यालयातून आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी आढावा घेतला आहे.
हेही वाचा - भाजपला सत्तेपासून दूर ठेवा; काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत आमदारांची मागणी