महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बहुमत भाजपच सिद्ध करणार; रवी राणा म्हणतात 'ये अंदरकी बात है' - ravi rana after meeting ajit pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कितीही म्हणत असले तरी पाठिंबा आम्हालाच मिळणार, ये अंदर की बात है', असे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीचे बंडखोर नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चर्चगेट येथील निवासस्थानी भेट घेतल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

आमदार रवी राणा

By

Published : Nov 24, 2019, 8:30 PM IST

मुंबई -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुखमंत्री अजित पवार 30 नोव्हेंबरला सभागृहात आपले बहुमत सिद्ध करतील असा ठाम विश्वास भाजप प्रणित अपक्ष आमदार रवी राणा यांनी व्यक्त केला आहे. 'राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कितीही म्हणत असले तरी पाठिंबा आम्हालाच मिळणार, ये अंदर की बात है', असे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीचे बंडखोर नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चर्चगेट येथील निवास स्थानी भेट घेतल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

आमदार रवी राणा

हेही वाचा -काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचे आमदार पुन्हा राजस्थानात येण्याचे अशोक गेहलोत यांचे संकेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बैठका सुरू आहेत. अजित पवार यांच्या सोबत गेलेले बहुतांशी आमदार परत आणण्यात आघाडीला यश आले आहे. याविषयी प्रतिक्रीया देताना राणा म्हणाले की, सभागृहात आम्ही 175 आमदारांच्या संख्येने बहुमत सिद्ध करू. ही सर्व प्रक्रिया लोकांच्या नजरेसमोर घडेल.

ABOUT THE AUTHOR

...view details