मुंबई - जनादेशाचा अवमान करत आम्ही सरकार स्थापन करणार नसल्याची भूमिका भाजपने घेतली आहे. शिवसेनेने जनादेशाचा अवमान केल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. शिवसेनेला जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकार स्थापन करायचे असेल तर त्यांनी करावे, त्यांना आमच्या शुभेच्छा असल्याचे पाटील म्हणाले.
आमच्याकडे सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेसे संख्याबळ नसल्याने आम्ही सत्ता स्थापन करणार नसल्याची भूमिका भाजपने घेतली आहे. आज भाजपच्या कोअर कमिटीने राज्यपालांची भेट घेतली त्यांनतर भाजपने पत्रकार परिषद घेत आपला निर्णय जाहिर केला. आता राज्यपालांना सत्ता स्थापनेसाठी दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी पाटारन करावे लागेल. त्यामुळे आता शिवसेनेची भूमिका काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.