महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसैनिकांच्या विरोधानंतरही किरीट सोमय्या यांना उमेदवारी ?

किरीट सोमय्या यांना ईशान्य मुंबईतून तिकीट देण्याची तयारी भाजपने दर्शवली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षाच्या बैठकीनंतर याबाबतचे संकेत दिले आहेत.

सुधीर मुनगंटीवार

By

Published : Mar 11, 2019, 9:42 PM IST

मुंबई- शिवसैनिकांचा विरोध झुगारुन पुन्हा किरीट सोमय्या यांना ईशान्य मुंबईतून तिकीट देण्याची तयारी भाजपने दर्शवली आहे. भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीनंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सोमय्या यांच्या तिकिटाचे संकेत दिले आहेत.

सुधीर मुनगंटीवार


भाजप आणि शिवसेनेची युती झाली, तरी ईशान्य मुंबईमधून भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना कोणत्याही प्रकारे मदत करणार नसल्याची भूमिका शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कळवली होती. मात्र कोणा एकाच्या विरोधनंतर असा मोठा निर्णय घेतला जात नाही. जिंकून येण्याची क्षमता पक्ष तपासतो. पक्षाने काही अंतर्गत सर्वे केले आहेत. प्रत्येक उमेदवाराचे काम आणि कामाची पद्धत तपासली जाणार आहे. त्यानुसार पक्ष उमेदवार घोषित करणार आहे. मात्र शिवसेनेच्या विरोधाची बाब मुनगंटीवार यांच्या निदर्शनाला अणल्यांनंतर त्यांनी शिवसेनेच्या विरोधाची दाखल घेतली नसल्याचे आपल्या वक्तव्यातून स्पष्ट केले.


एकमेकांवर जहरी टीका करण्यात आल्यानंतरही लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेनेने युतीचा निर्णय घेतला. मात्र गेल्या चार वर्षात दुभंगलेली सामान्य कार्यकर्त्यांचे मन वळवणे हेच युतीच्या नेत्यांपुढील आव्हान कायम असल्याचे चित्र आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details