मुंबई - 'मराठा समाजाला आमच्या सरकारने आरक्षण दिले होते. त्यांना आता मान्यता मिळत नाही. हे सरकार काहीच काम करत नाही. सगळेच केंद्राकडे मदत मागतात. अशोक चव्हाण यांना तर सवयच लागली आहे. जर तुमचा अभ्यास बरोबर असेल, तर असे का झाले? कोणी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असतील, तर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. माझ्या मनात अजित पवारांविषयी अनेक प्रश्न आहेत', असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
'मराठा आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास उशीर का झाला?'
'या सरकारला हे आरक्षण टिकवता आले नाही. मराठा आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास उशीर का झाला? याचे उत्तर आधी दिले पाहिजे. ओबीसीच्या आरक्षणाबाबतही असेच झाले आहे. कशासाठी हा उशीर होतो? हे संबंधितांनी सांगितले, पुनर्विचार याचिकेशिवाय पर्याय नाही. तसे केले तरच या गोष्टी पुढे जातील. हे सर्व करताना वेळ लागणार आहे. राज्य सरकारने याबाबत उशीर करणे योग्य नव्हते', असे चंद्रकांत पाटलांनी म्हटले आहे.
'पेट्रोल वाढीबाबत राज्य सरकारने कर कमी करावा'