मुंबई -राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर उलट सुलट चर्चेला ऊत आला आहे. अजित पवार यांचे पक्षातील महत्व कमी होतय का? त्यामुळे पक्षात संघर्ष उफाळून आलाय का? असा सवाल भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी केला आहे. विधानसभेची मुदत ९ नोव्हेंबरपर्यंत असताना अजित पवार यांनी मुदतीआधीच राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.
पवार यांच्या राजीनाम्या संदर्भात पक्षाचे नेते काहीही बोलण्यास तयार नाही. याबाबत थेट पक्षाध्यक्ष शरद पवारच बोलतील, अशी सारवासारव केली जात आहे. लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यावरून शरद पवार आणि अजित पवार यांच्यात मतभेद झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. यातच पक्षातले अनेक नेते अजित पवार यांच्या कार्यशैलीला कंटाळून पक्षाला रामराम करत असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.