महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मानखुर्द-शिवाजीनगरमध्ये महायुतीची ताकद, विठ्ठल लोकरेंना रिपब्लिकन जनशक्तीचा पाठिंबा - mankhurd shivajinagar alliance candidate

मानखुर्द-शिवाजीनगर परिसरात, रिपब्लिकन जनशक्तीला मानणारा मोठा वर्ग आहे. वास्तविक 2014 पासून शिवसेनेसोबत असणाऱ्या या पक्षाने गेल्या विधानसभा निवडणुकीतही महायुतीच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला होता.

विठ्ठल लोकरेंना रिपब्लिकन जनशक्तीचा पाठिंबा

By

Published : Oct 16, 2019, 10:05 AM IST

Updated : Oct 16, 2019, 1:46 PM IST

मुंबई -मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल लोकरे यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. त्यातच विठ्ठल लोकरे यांना रिपब्लिकन जनशक्ती पक्षाने जाहीर पाठिंबा दिल्याने या मतदारसंघात महायुतीची ताकद आणखी वाढली आहे.

हे वाचलं का? - '14 हजार शेतकरी आत्महत्येचे पाप कुठे फेडाल?'

मानखुर्द-शिवाजी नगर परिसरात, रिपब्लिकन जनशक्तीला मानणारा मोठा वर्ग आहे. वास्तविक 2014 पासून शिवसेनेसोबत असणाऱ्या या पक्षाने गेल्या विधानसभा निवडणुकीतही महायुतीच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला होता, असे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रिपब्लिकन जनशक्तीचे मुंबई प्रदेश अध्यक्ष यांनी महायुतीचे उमेदवार विठ्ठल लोकरे यांची भेट घेऊन पत्रक दिले आणि आपला पाठिंबा जाहीर दिला आहे.

Last Updated : Oct 16, 2019, 1:46 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details