महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लहान मोठ्याचा प्रश्न नाही, शिवसेना भाजप दोघे भाऊ - सुधीर मुनगंटीवार - maratha reservation

महायुतीबाबत जे काही बोलायचे आहे ते मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व दोन्ही पक्षाचे अधिकृत प्रवक्ते बोलतील, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. मराठा आरक्षण सुनावणीचा निर्णय जेव्हा येईल तेव्हा त्यावर विरोधी पक्ष 'मौनम सर्वार्थ साधनम' हे वृत्त धारण करेल, असे देखील ते म्हणाले.

शिवसेना भाजप दोघे भाऊ - सुधीर मुनगंटीवार

By

Published : Jun 24, 2019, 8:47 PM IST

मुंबई - युतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यावर मुख्यमंत्री कोण याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील. यामध्ये शिवसेना भाजप पैकी कोण लहान कोण मोठा भाऊ हे महत्वाचे नाही, आम्ही दोघे भाऊ आहोत, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

शिवसेना भाजप दोघे भाऊ - सुधीर मुनगंटीवार

आज विधानभवनाच्या पाचव्या मजल्यावर भाजप शिवसेना व मित्र पक्षाचे आमदार यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. अधिवेशनाच्या राहिलेल्या कालावधीत जनतेच्या प्रश्नाला योग्य पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे यासाठीही मार्गदर्शन केले.
शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची उपसभापती पदी निवडणूक झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाबाबत युतीमध्ये चर्चा सुरू होईल. या निवडणुकीत आम्ही एका विचाराने २२० पेक्षा अधिक जागा जिंकू, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
महायुतीबाबत जे काही बोलायचे आहे ते मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व दोन्ही पक्षाचे अधिकृत प्रवक्ते बोलतील असे मुनगंटीवार यांनी सांगितले. मराठा आरक्षण सुनावणीचा निर्णय जेव्हा येईल तेव्हा त्यावर विरोधी पक्ष 'मौनम सर्वार्थ साधनम' हे वृत्त धारण करेल, असे देखील ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details