महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Gram Panchayat Election 2022 ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप शिंदे गटाकडून विजयाचे दावे - ग्राम पंचायत निवडणूक निकाल 2022

राज्यात ग्राम पंचायत निवडणुकीच्या निकालात भाजप, शिंदे गट आणि महाविकास आघाडीकडून ( BJP Shinde Faction and Maha Vikas Aghadi Leaders Claim Won Election ) विजयाचे दावे प्रतिदावे केले जात आहेत. ग्राम पंचायत निवडणुका ( Gram panchayat Election ) या पक्षाच्या चिन्हांवर लढल्या जात नाहीत. तरी प्रत्येक पक्षाच्या नेत्याने आपणच बाजी मारल्याचा दावा केला आहे. महाविकास आघाडीच्या ( Maha Vikas Aghadi ) नेत्यांनी आम्हीच क्रमांक एकवर असल्याचे सांगितले आहे. तर भाजप आणि शिंदे गटाच्या ( Shinde Faction ) नेत्यांनीही आपण क्रमांक एकवर असल्याचा दावा नागपुरातील हिवाळी अधिवेशनात ( Nagpur Winter Session ) केला आहे.

Gram Panchayat Election
संग्रहित छायाचित्र

By

Published : Dec 20, 2022, 5:27 PM IST

मुंबई -राज्यात झालेल्या 7751 ग्रामपंचायतीचा ( Gram panchayat Election ) निकाल हाती यायला सुरुवात झाली आहे. मतमोजणीला सकाळपासून सुरुवात झाल्यानंतर भाजप शिंदे गट आणि महाविकास आघाडीत ( BJP Shinde Faction and Maha Vikas Aghadi Leaders Claim Won Election ) काटे की टक्कर सुरू होती. आता मात्र दोन्ही पक्षाच्या वतीने आपल्याच पक्षाला ग्राम पंचायत निवडणुकीत यश मिळाल्याचा दावा केल्या जात आहे. महाविकास आघाडीला ( Maha Vikas Aghadi ) 1810 तर भाजप शिंदे गटाला ( Shinde Faction ) 1976 जागा मिळाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सर्वाधिक भाजपला 1361, शिंदे गटाला 615, ठाकरे गटाला 443, राष्ट्रवादी 838, काँग्रेस 529, इतर 837 जागा मिळाल्याचा दावा केला जातो आहे. संपूर्ण मतमोजणी नंतर हे चित्र स्पष्ट होणार आहे.

भाजप, शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी चुरस रंगलीराज्याच्या हिवाळी अधिवेशनाला ( Nagpur Winter Session ) सुरुवात झाली असल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. विधानभवनात दोघेही आमने-सामने आले असतानाच आज ग्रामपंचायतच्या निवडणुकांचे निकाल ( Gram Panchayat Election Result ) जाहीर होत आहेत. थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमानुसार पार पडलेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढल्या गेल्या नसल्या, तरी महाविकास आघाडीतील ( BJP Shinde Faction and Maha Vikas Aghadi Leaders Claim Won Election ) घटक पक्ष, शिंदे गट आणि भाजप ( Bjp Maharashtra ) पुरस्कृत उमेदवारांमध्ये जोरदार लढत रंगली होती. त्यामुळे या निवडणुकीत कोणाला सर्वाधिक जागा मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



सध्या हाती आलेले निकाल

ठाकरे गट - 443
काँग्रेस - 529
राष्ट्रवादी काँग्रेस - 838
भाजप - 1361
शिंदे गट - 615
इतर - 837

ABOUT THE AUTHOR

...view details