मुंबई- येणाऱ्या 21 मे रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून ज्येष्ठ नेत्यांना वगळण्यात आले आहे. प्रविण दटके,गोपीचंद पडळकर, डॉ. अजित गोपछडे आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
विधानपरिषद निवडणुकीसाठी एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या तिघांनाही उमेदवारी देण्यास भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील श्रेष्ठींकडून त्यांच्या नावाला लाल कंदील मिळाला. त्यामुळे त्यांचे राजकीय पूनर्वसन होणार की नाही याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.
विधानसभा निवडणुकीत बावनकुळे आणि खडसे यांचे तिकिट नाकारण्यात आले होते. त्यामुळे यंदाच्या विधानपरिषदेत त्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा भाजप नेते व कार्यकर्त्यांना होती. विधानपरिषदेबाबात एकनाथ खडसे यांनी इच्छाही व्यक्त केली होती. पण, यंदाही त्यांच्या पदरी निराश आली आहे.