महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपची निकालाआधीच विजयी जल्लोषाची तयारी - महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन रिजल्ट

मुंबईतील प्रदेश कार्यालयात भाजपकडून लाडू आणि मिठाई बनवण्यात येत आहे. तसेच बाहेर व्यासपीठ उभारून सजावट करण्यात येणार असून या ठिकाणी विजयी उमेदवारांचे स्वागत आणि अभिनंदन करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजप कार्यालयातुन देण्यात आली आहे.

भाजपची निकालाआधीच विजयी जल्लोषाची तयारी

By

Published : Oct 23, 2019, 7:45 PM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीचे निकाल लागायला काही तासच उरले आहेत .भारतीय जनता पक्षाला विजयाचा जबरदस्त आत्मविश्वास असल्याचे दिसून येत आहे. गुरूवारी (ता.२४) निकाल लागणार असला तरी, भाजपने निकालाच्या एक दिवस आधीच विजयाच्या जल्लोषाची तयारी सुरू केली आहे.

भाजपची निकालाआधीच विजयी जल्लोषाची तयारी

हेही वाचा -मोदींप्रमाणे मुख्यमंत्र्यांचाही 'केदारनाथ फॉर्म्युला'; महादेवाचे घेतले दर्शन

मुंबईतील प्रदेश कार्यालयात भाजपकडून लाडू आणि मिठाई बनवण्यात येत आहे. तसेच बाहेर व्यासपीठ उभारून सजावट करण्यात येणार असून या ठिकाणी विजयी उमेदवारांचे स्वागत आणि अभिनंदन करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजप कार्यालयातुन देण्यात आली आहे.

हेही वाचा -MAHA VIDHANSABHA Big Fights : उद्या फैसला.. उमेदवारांचे देव पाण्यात, राज्यातील ५० लक्षवेधी लढती

तसेच भाजपचा निवडणुकीतील विजय साजरा करण्यासाठी निकालाच्या आदल्या दिवशीच लाडू बनविण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वीच भाजपला आपलाच विजय होणार असल्याचा आत्मविश्वास आहे. त्यामुळेच भाजपने मोठ्या प्रमाणात विजयाची तयारी केली आहे. तसेच माध्यमांच्या एक्झिट पोल नुसार भाजपला भरघोस जागा मिळणार आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपने विजया अगोदरच जल्लोषाची तयारी केलेली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details