महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प अन् बरंच काही...भाजपचे 'संकल्पपत्र' प्रसिद्ध

छोटी राज्य करण्याच्या भूमिकेवर भाजप अजूनही ठाम असल्याचे यावेळी पक्षाचे नेते माधव भांडारी यांच्याकडून स्पष्ट आले. भाजपचे ज्येष्ठ नेते विनय सहस्त्रबुद्धे, माधव भांडारी आणि केशव उपाध्ये यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.

By

Published : Oct 15, 2019, 10:50 AM IST

Updated : Oct 15, 2019, 5:53 PM IST

दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प अन् बरंच काही...भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

मुंबई - राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून मंगळवारी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. ‘दृष्टीपत्र’ या नावाने तयार करण्यात आलेल्या भाजपच्या जाहीरनाम्यात तुर्तास तरी वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर भाष्य करण्याचे टाळण्यात आले आहे. विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा करण्याच्या भूमिकेचा आगामी निवडणुकांत फटका बसू नये, यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे बोलले जात आहे. जाहीरनाम्यात वेगळ्या विदर्भाचा मुद्दा नसला तरी, छोटी राज्य करण्याच्या भूमिकेवर भाजप अजूनही ठाम असल्याचे यावेळी पक्षाचे नेते माधव भांडारी यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. भाजपचे ज्येष्ठ नेते विनय सहस्त्रबुद्धे, माधव भांडारी आणि केशव उपाध्ये यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.


भाजपच्या जाहीरनाम्यातील ठळक आश्वासने पुढीलप्रमाणे:

  • महाराष्ट्रात लोकसेवा हमी कायदा आणणार
  • सरकारी कार्यालयांमध्ये एकखिडकी योजना लागू करणार
  • सत्तेत आल्यास त्वरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारणार
  • ठिंबक सिंचन योजनेसाठी ५० टक्के अनुदान देणार
  • राज्यात ऊसतोड कामगार कल्याण योजना आणणार
  • महाराष्ट्रात माहिती आणि तंत्रज्ञान उद्योग विकास प्राधिकरणाची स्थापना करणार
  • माहेरचा आधार ही पेन्शन योजना
  • पेट्रोल, डिझेलचे दर कमी करणार
  • वयोवृद्ध शेतक-यांसाठी अन्नदाता आधार योजना
  • मराठी शाळांचे आर्थिक सबलीकरण करणार
  • वृद्ध श्रमिक पत्रकारांना मासिक १५०० रूपये मानधन
  • दुष्काळमुक्त महाराष्ट्राच संकल्प
  • कोकणात पाणी भरपूर पण पिण्याचे पाणी नाही त्यावर उपाय करणार
  • मराठवाडा ग्रिड, प्रत्येक गावा पर्यंत पाणी पाईपने पुरवणार, प्रत्येकाला पिण्याचे पाणी
  • १२ तास शेतीला वीज देणार (सौर उर्जा)
  • पुढच्या ५ वर्षात १ कोटी रोजगार देणार,५९ लाख लोकांना गेल्या ५ वर्षात रोजगार निर्माण झाले
  • ५ लाख कोटी गुंतवणूक करून पायाभूत सुविधा देणार
  • बेघराला घर देणार
  • ३० हजार किलोमीटरचे ग्रामीण भागात रस्ते बनवणार ग्राम सडक योजना
  • रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र यंत्रणा
  • ९० टक्के लोकांना मोफत आरोग्य उपचार देणार
  • प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करणार
  • महात्मा फुले आणि सावित्राबाई फुले, सावरकर यांना भारतरत्न मिळाले पाहीजे
  • जन्मशताब्दीला मोठ्या व्यक्तींचा गौरव
  • खुला प्रवर्ग - समाजातील सर्व घटकांसाठी प्रभावी योजना देणार
  • बचत गटांची मोठी श्रृंखला, ४० लाख कुटुंब बचत गटांना जोडणार
  • ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला काम देणार
  • कृष्णा कोयनेचे वाहून जाणारे पाणी प. म. च्या दुष्काळी भागात नेणार
  • शेतकऱ्यांना १२ तास वीज
  • १ कोटी नोकऱ्या
  • महिलांना रोजगार
  • प्रत्येक घराला पिण्याचे पाणी
  • संपूर्ण महाराष्ट्राला इंटरनेटने जोडणार
  • शिक्षण मुल्यांवर आधारीत
  • सर्व कामगारांची नोंदणी सामाजिक सुरक्षा
  • माजी सैनिक शहीद पोलिसांच्या कुटुंबाचे पुनर्वसन
  • विस्थापितांनासाठी वेगळा कार्यक्रम
  • दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य
Last Updated : Oct 15, 2019, 5:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details