मुंबई: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या अभियानात केंद्रीय मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय पदाधिकारी असे २२७ प्रमुख नेते लोकसभेच्या सर्व मतदारसंघात प्रवास करणार आहेत. ३१ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अजमेर येथे होणाऱ्या सभेने अभियानाला प्रारंभ होणार असल्याचेही विनोद तावडे यांनी सांगितले.
'ही' आहे कार्यक्रमाची रुपरेषा:याप्रसंगी विनोद तावडे यांनी सांगितले की, ३० मे ते ३० जून या काळात होणाऱ्या या 'महाजनसंपर्क अभियाना'त मोदी सरकारच्या विविध योजनातील लाभार्थींचे संमेलन, प्रबुद्ध संमेलन, जनसंघापासून काम करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी असे अनेक कार्यक्रम राबविले जाईल. प्रत्येक लोकसभा मतदार संघात समाजातील मान्यवर, प्रभावशाली व्यक्ती, पद्म पुरस्कार, खेल पुरस्कार व अन्य महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त व्यक्ती अशा सुमारे साडेपाच लाख मान्यवरांना ‘संपर्क ते समर्थन’ या कार्यक्रमाअंतर्गत व्यक्तिगत भेटी दिल्या जाईल. त्यांच्यापर्यंत मोदी सरकारची कामगिरी पोहोचवली जाणार आहे. विचारवंतांबरोबर त्या लोकसभा मतदारसंघात प्रवास करणारे राष्ट्रीय नेते, केंद्रीय मंत्री हे गेल्या ९ वर्षांतील देशाच्या प्रगतीबाबत विचारमंथन करतील. तसेच जनसंघापासून भाजपमध्ये काम करणारे वरिष्ठ कार्यकर्ते, भाजप विचाराला समर्थन देणारे अन्य संस्थांचे कार्यकर्ते यांच्याशीही केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय नेते संवाद साधतील.
महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत अजमेर येथे 31 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. येथून अभियानाला सुरुवात होऊन ते 30 जून पर्यंत चालेल. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वात देशातील 80 कोटी नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे पक्षाचे नियोजन आहे. दरम्यान पीएम मोदी यांच्या 9 वर्षांच्या कार्यकाळाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविली जाईल. - विनोद तावडे, राष्ट्रीय सरचिटणीस, भाजप