महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेसच्या आमदारांना २५ ते ५० कोटींची ऑफर, विजय वडेट्टीवार यांचा गौप्यस्फोट - maharashtra government formation

आमदार फुटण्याची भीती असल्याने काँग्रेसकडून आज अनेक आमदार जयपूरसाठी रवाना केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

विजय वडेट्टीवार

By

Published : Nov 8, 2019, 12:32 PM IST

Updated : Nov 8, 2019, 12:39 PM IST

मुंबई - भाजप कडून सत्तास्थापनेसाठी काँग्रेसचे अनेक आमदार फोडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काँग्रेसच्या आमदारांना 25 ते 50 कोटी रुपयांची प्रलोभने दाखवली जात आहेत. त्यामुळे भाजप काहीही करू शकते, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. त्याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेसची बैठक होत आहे.

विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर पोहोचताना बाळासाहेब थोरात

विधानसभेची मुदत उद्या संपुष्टात येत असल्याने राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. यासाठी आज शुक्रवारी मुंबईत विविध राजकीय पक्षांच्या बैठका आणि भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. त्यातच काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर होत आहे. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक आमदार उपस्थित आहेत. बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात पोहोचले असून त्यांनी माध्यमांशी काहीही बोलण्याचे टाळले.

आमदार फुटण्याची भीती असल्याने काँग्रेसकडून आज अनेक आमदार जयपूरसाठी रवाना केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Last Updated : Nov 8, 2019, 12:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details