महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 3, 2021, 5:31 PM IST

ETV Bharat / state

भाजपा ओबीसी मोर्चाचे मुंबईत आक्रोश आंदोलन

राज्यभर भाजपा ओबीसी मोर्चाकडून आक्रोश आंदोलन करण्यात आले आहेत. मुंबईमध्ये भाजपा कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

आंदोलक
आंदोलक

मुंबई -राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द झाले आहे. त्याची नैतिक जबाबदारी घेऊन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपा ओबीसी मोर्चाने केली आहे. यासंदर्भात आज (दि. 3 जून) राज्यभर भाजप ओबीसी मोर्चाकडून आक्रोश आंदोलन करण्यात आले आहेत. मुंबईमध्ये भाजपा कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात मुंबई, नवी मुंबई येथील भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलना दरम्यान योगेश टिळेकर म्हणाले, हे वसुली सरकार आहे. यांनी सर्व प्रकारचे आरक्षण घालवले आहे. मराठा समाजाचे असो, ओबीसीचा राजकीय आरक्षण असो किंवा पदोन्नतीतील आरक्षण असो त्यामुळे हे काढून घेणारे सरकार आहे. सरकार काही देऊ शकत नाही तर निदान काढून तरी घेऊ नका. नाहीतर येत्या काळात मोठा आंदोलन तुम्हाला पाहायला मिळेल आणि महाराष्ट्र पेटून उठेल. छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार या दोन्ही मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे, अशी मागणी योगेश टिळेकर यांनी केली आहे.

"भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चा याबाबत पूर्णपणे संविधानिक व लोकशाही मार्गाने संघर्ष करून ओबीसींच्या रद्द झालेले आरक्षण परत मिळवून देईपर्यंत शांत बसणार नाही. भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने आम्ही सरकारकडे मागणी करतो की, सरकारने त्वरित एक स्वतंत्र आयोग नेमून राज्यातील ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी. त्या जनगणनेच्या आधारावर लोकसंख्येच्या अनुपातात ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण बहाल करावेत, असे न झाल्यास 15 जूननंतर निर्बंध शिथिल झाल्यानंतर भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन उभारू, असा इशारा आमदार संजय कुटे यांनी सरकारला दिलेला आहे.

हेही वाचा -Maharashtra unlock : महाराष्ट्र पाच स्तरावर होणार 'अनलॉक'; राज्यातील 18 जिल्हे पूर्णपणे 'अनलॉक', तर मुंबई लोकलचा निर्णय 15 जूननंतर

ABOUT THE AUTHOR

...view details