महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रकांत पाटील म्हणतात.. इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याचं समर्थन नाहीच, मात्र... - indorikar maharaj latest news

पाटील पुढे म्हणाले, आम्ही इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही. त्यांनी महिलांबद्दल केलेले वाक्य चुकीचेच आहे. मात्र, त्यांच्या प्रवचनांमध्ये मोठी गर्दी असते. मी स्वतः त्यांची अनेक प्रवचने ऐकली आहेत. ते मार्मिक पणे समाजातील मुद्यांवर बोट ठेवतात. म्हणून त्यांच्या एका चुकीमुळे त्यांनी केलेले कार्य मिटत नसल्याचेही ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

By

Published : Feb 17, 2020, 3:48 PM IST

मुंबई - इंदोरीकर महाराज यांच्या वक्तव्याचे समर्थन नाही. मात्र, ते इतरही विषय मांडतात. त्यांच्या एका वक्तव्याने त्यांचे इतर कार्य नाकारता येणार नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. मात्र, त्यांनी महिलांविषयी तसे म्हणायला नको होतो, हे मी पुन्हा सांगतो, असेही ते म्हणाले. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची पुन्हा निवड झाली आहे. यानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पाटील पुढे म्हणाले, आम्ही इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही. त्यांनी महिलांबद्दल केलेले वाक्य चुकीचेच आहे. मात्र, त्यांच्या प्रवचनांमध्ये मोठी गर्दी असते. मी स्वतः त्यांची अनेक प्रवचने ऐकली आहेत. ते मार्मिक पणे समाजातील मुद्यांवर बोट ठेवतात. म्हणून त्यांच्या एका चुकीमुळे त्यांनी केलेले कार्य मिटत नसल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा -सत्य बाहेर येईल म्हणूनच पवारांचा 'एनआयएला' विरोध - फडणवीस

काय आहे प्रकरण ?

कीर्तनकार इंदोरीकर महाराजांनी एका किर्तनात 'सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा आणि विषम तिथीला झाला तर मुलगी होते,' असे वक्तव्य केले होते. यानंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली. तसेच ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांनी केलेले वक्तव्य 'पीसीपीएनडिटी अ‌ॅक्ट'नुसार (प्रसूतिपूर्व गर्भलिंग परीक्षण प्रतिबंध कायदा) अपराध आहे. त्यामुळे, अहमदनगरच्या पीसीपीएनडिटी सल्लागार समितीने त्यांच्याविरोधात नोटीस काढली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि तो सिद्ध झाला तर त्यांना 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.

ABOUT THE AUTHOR

...view details