मुंबई - 'मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सध्या जोरात सुरु आहे. पण, लसीकरण आणखी मोठ्या प्रमाणात व्हावे यासाठी पालिकेने घरोघरी जाऊन लसीकरण करून घ्यावे. पालिका दर महिन्याला कोरोनावरील उपाययोजनांसाठी ४०० ते ४५० कोटी रूपये खर्च करत आहे. त्यापेक्षा लसीसाठी १५० कोटी रुपये खर्च करून मुंबईला कोरोनामुक्त करावे', अशी मागणी भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्याकडे केली आहे.
'मोफत लस द्या'
भाजप खासदार मनोज कोटक यांनी आज (6 मे) पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची भेट घेतली. या भेटीनंतर कोटक पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, की 'घरोघरी जाऊन लसीकरण करण्याची मागणी आम्ही केली आहे. या मागणीबाबत पालिका आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. आम्ही एनजीओच्या माध्यमातून लसीकरण करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी खासगी रुग्णालयांप्रमाणे प्रत्येक लाभार्थ्यांमागे १०० रुपये खर्च करण्याची आमची तयारी असल्याचे आम्ही आयुक्तांना सांगितले. त्यावर राज्य सरकारकडून आम्हाला लस घ्यावी लागते. पालिकेला लस विकत घेण्याची परवानगी नाही, असे आयुक्तांनी सांगितले. तर, पालिकेने राज्य सरकारकडून लस विकत घ्यावी किंवा लागणाऱ्या लसीचा पैसा पालिकेने देऊन सर्व मुंबईकरांना मोफत लस द्यावी अशी मागणी आम्ही केली', असे कोटक यांनी सांगितले.
'१५० कोटी खर्च करून कोरोनामुक्त करा'