मुंबई -राज्यात सात ते आठ महिन्यानंतर मंदिरं खुली करण्यात आली आहेत. गेले तीन महिने भाजपा तसेच विविध राजकीय संघटनांकडून मंदिरे उघडण्यासाठी रस्त्यावर आंदोलने करण्यात आली होती. मात्र सरकारने तीन महिन्यात त्याकडे लक्ष दिले नाही. मात्र परवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारपासून मंदिरे खुली करण्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे भाजपाकडून आज मुंबईत सिद्धिविनायक मंदिर परिसरात ढोल-ताशे वाजवत गुलाल उडवीत जल्लोष करण्यात आला.
लोकांचा आक्रोश पाहून सरकारने दिली परवानगी
मागील तीन महिन्यांपासून भाजपा व काही राजकीय पक्षांतर्फे मंदिरे खुली करण्यासाठी घंटानाद तसेच रस्त्यावर उतरून आंदोलने करण्यात आली होती. मात्र तीन महिने सरकारने मंदिर उघडण्यास परवानगी दिलेली नव्हती. मात्र परवा अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारपासून मंदिरे उघडण्याची परवानगी दिली. यावर भाजपा नेत्यांनी लोकांचा आक्रोश पाहून सरकारने ही परवानगी दिल्याचं म्हटलं आहे.