राम कदम यांची प्रतिक्रिया मुंबई :22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा प्राणतिष्ठा सोहळा होणार आहे. त्या दिवशी महाराष्ट्रात दारू, मांसावर बंदी घालावी, अशी मागणी भाजपा आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं केलीय. तसंच संपूर्ण देशात दारू, मांसावर बंदी घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारला विनंती करावी, असं आमदार राम कदम यांनी म्हटलं आहे.
दारू, मासबंदी करा :मोठ्या संघर्षानंतर अयोध्येत राम मंदिर भव्य स्वरूपात उभं राहत आहे. 22 जानेवारी रोजी राम मंदिरात प्राणतिष्ठापना सोहळा होणार आहे. साडेचारशे वर्षांच्या संघर्षानंतर देशभरात करोडो रामभक्त दिवाळी साजरी करणार आहेत. 22 जानेवारीच्या शुभ दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात दारूसह मांसबंदी करावी, अशी विनंती भाजपा आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं केलीय. तसंच महाराष्ट्र सरकारनं याबाबत केंद्र सरकारला संपूर्ण देशात एक दिवसाची सामुहिक दारूबंदी लागू करावी, अशी मागणी करणारे करोडो राम भक्त असल्याचं भाजपा आमदार राम कदम यांनी म्हटलं आहे.
विविध कार्यक्रमांचे आयोजन :22 जानेवारी हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा ऐतिहासिक दिवस असणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेलं अयोध्येतील श्रीराम मंदिर 22 जानेवारीला सर्वांसाठी खुलं होणार आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. देशभरातून भाविक अयोध्या नगरीत येऊ लागले आहेत. त्यानुसार अयोध्या शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अनेक महत्त्वाच्या व्हीआयपींना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. विश्व हिंदू परिषद 1 जानेवारीपासून देशभरात विशेष मोहीम राबवत आहे. उद्घाटन सोहळ्यानिमित्त लोकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा -
- खोके सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळं राज्य उद्ध्वस्त, आदित्य ठाकरेचं जनतेला खुलं पत्र
- लोकसभेत महाविकास आघाडी 40 ते 41 जागा जिंकणार - नाना पटोले
- "गोध्रासारखी घटना 'येथे' होऊ शकते", राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान