महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'आता कारशेड हलवणार की अहंकारासाठी थांबवणार' - भाजप नेते आशिष शेलार न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता मेट्रोच्या कारशेडवरून केंद्र विरुद्ध राज्य सरकार आमनेसामने आले आहे. कारण मेट्रो कारशेडची कांजूरमार्गची जागा ही केंद्राची असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. काम थांबवा, असे पत्रही केंद्राने राज्य सरकारला पाठवले आहे.

राम कदम, आशिष शेलार
राम कदम, आशिष शेलार

By

Published : Nov 3, 2020, 3:17 PM IST

Updated : Nov 3, 2020, 3:27 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता मेट्रोच्या कारशेडवरून केंद्र विरुद्ध राज्य सरकार आमनेसामने आले आहे. कारण मेट्रो कारशेडची कांजूरमार्गची जागा ही केंद्राची असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. काम थांबवा, असे पत्रही केंद्राने राज्य सरकारला पाठवले आहे. यावर भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर टीका करताना 'अहंकारासाठी कारशेड हलवणार की थांबवणार आहात,' असा सवाल केला आहे.

'आता कारशेड हलवणार की अहंकारासाठी थांबवणार'

हेही वाचा -कल्याण-शिळ मार्गावर पुन्हा मोठी जलवाहिनी फुटली; रस्त्याला नदीचे स्वरूप

भाजप नेते राम कदम यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. 'गोरेगाव येथील कारशेड हलवून कांजूरमार्ग येथे हलवणार हा महाराष्ट्र सरकारचा निर्णय जनतेच्या 4 हजार कोटी रुपयांची बरबादी करणारा आहे. केवळ शिवसेना नेत्यांचा हट्टापायी आणि अहंकारासाठी जनतेच्या पैशाची लूट केली जात आहे. आरेच्या ठिकाणी सर्व काम झाले असताना सरकारचा हट्ट कारशेड हलवण्यासाठी कशाला करताय? एवढंच जर असेल तर, त्या नेत्यांनी स्वतःच्या खिशातले पैसे टाकावे. केंद्र सरकारकडून राज्य सरकारला हे कारशेडचे काम करता येणार नाही, काम थांबवा, असे पत्र पाठवून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता हे राज्य सरकार काम थांबवणार की आपल्या स्वतःच्या अहंकारासाठी ते चालू ठेवणार, ते पाहणे गरजेचे ठरणार आहे,' असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -न्हावा-शेवा बंदरातून १४ कोटींचा विदेशी सिगारेट साठा जप्त

Last Updated : Nov 3, 2020, 3:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details