महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ram Kadam on BMC : नासा वैज्ञानिकांनी मुंबई महानगर पालिका अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा - राम कदम - राम कदमांची बीएमसीवर टीका

नासा वैज्ञानिकांनी ( NASA Scientist ) विशेष मागणी करून मुंबई महानगर पालिका ( BMC ) अधिकाऱ्यांचा सल्ला घेण्यासाठी पाचारण करावे, अशी मागणी भाजप नेते, आमदार राम कदम ( Bjp Mla Ram Kadam On BMC ) यांनी केली आहे.

Ram Kadam
राम कदम

By

Published : Mar 29, 2022, 4:25 PM IST

मुंबई -नासा वैज्ञानिकांनी ( NASA Scientist ) विशेष मागणी करून मुंबई महानगर पालिका ( BMC ) अधिकाऱ्यांचा सल्ला घेण्यासाठी पाचारण करावे, अशी मागणी भाजप नेते, आमदार राम कदम ( Bjp Mla Ram Kadam On BMC ) यांनी केली आहे. मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मुंबईत गाय स्वतः ड्रेनेजच्या टाकीचे झाकण उघडते व त्यात पडते, हा नवीन शोध लावल्याचे म्हणत त्यांनी ही मागणी केली आहे.

याबाबत बोलताना भाजप आमदार राम कदम
काय आहे प्रकरण? -ड्रेनेजच्या टाकीत गाय पडल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईतील दादर भागात असलेल्या कबुतर खाना परिसरात काल सकाळी ड्रेनेजच्या टाकीत गाय पडली. सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ड्रेनेज टाकीच्या झाकणावर गाय उभी असताना, झाकण सरकून गाय आत पडल्याची माहिती आहे. मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवानांनी तिला बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. बीएमसीचे कर्मचारी सुद्धा घटनास्थळी उपस्थित होते व ते सुद्धा गायीला सुखरुप बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न करत होते. या दरम्यान गायीपर्यंत चारा आणि पाणीही पोहोचवण्यात येत होत. अखेर ५ तासांच्या अथक प्रयत्नानंतर गाईला सुखरूप बाहेर काढण्यात आले. यावर प्रतिक्रिया देताना मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी गाईने स्वतः ड्रेनेजचे झाकण उघडले व ती आत पडली असे म्हटले आहे. यावरून भाजप आमदार राम कदम यांनी महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा -Aditya Thackeray On Nanar Project : नाणार रिफायनरी प्रकल्प लोकांवर लादला जाणार नाही -आदित्य ठाकरे

काय म्हणाले राम कदम -मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरावर राम कदम म्हणाले की नासा वैज्ञानिकांनी विशेष मागणी करून मुंबई महानगर पालिका अधिकाऱ्यांचा सल्ला घेण्यासाठी पाचारण करावे. त्यांचा नवीन शोध पहा. भ्रष्ट मुंबई महानगर पालिकेचे अधिकारी म्हणतात, गाईने स्वतः रस्त्यावरील गटाराचे झाकण उघडले. जर असे असेल तर ते झाकण किती निकृष्ट दर्जाचे होते. याचीही चौकशी व्हायला पाहिजे. मुंबईला लुटण्याचे काम महानगर पालिका करत आहे. मुंबईतील सर्व गटारांवरील झाकणांची चौकशी व्हायला हवी अशी मागणी राम कदम यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details