मुंबईPraveen Derkar On Ajit Pawar :आमदार प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर ट्विटद्वारे जोरदार टीका केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याच्या प्रश्नावर उत्तर देताना सभागृहात माहिती दिली होती. खोटं बोल पण रेटून बोल हा देवेंद्र फडणवीस यांचा गुणधर्म असल्याचं पवार यांनी म्हटलं. खोटे बोलणं, पण तर्कबुद्धीनं बोलणं हा देवेंद्र फडणवीसांचा गुण असल्याचं पवार म्हणाले. रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला प्रवीण दरेकर यांनी ट्विटद्वारे प्रत्युत्तर दिलं आहे.
आदित्यला बाळ म्हणतात, रोहित पवारांना दादा :आदित्य ठाकरे यांना बाळ म्हणतात, तर रोहित पवारांना दादा म्हणतात. मात्र, आदित्य सोबत असल्यामुळं कदाचित तुम्हाला बाळबोध झाला की काय? असा सवाल दरेकर यांनी केला. शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये घेण्यात आला आहे. दुष्काळाच्या निकषाप्रमाणे मदत होत असून त्याचा जीआर नंतरच निघतो, याची आधी माहिती घ्या, मग बोला असं दरेकरांनी रोहित पवारांना सुनावलं आहे.