महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'राजगृहावर हल्ल्याचे षडयंत्र रचणाऱ्याला फाशीची शिक्षा द्या'

भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर करण्यात आलेला हल्ला हा अत्यंत निषेधार्य असून या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई तसेच षडयंत्र रचणाऱ्यांना फाशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे.

bjp mla prasad lad reaction on babasaheb ambedkar Rajgruh residence house attack
'राजगृहावर हल्ल्याचे षडयंत्र रचणाऱ्याला फाशीची शिक्षा द्या'

By

Published : Jul 8, 2020, 10:27 AM IST

मुंबई -भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर करण्यात आलेला हल्ला हा अत्यंत निषेधार्य असून या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई तसेच षडयंत्र रचणाऱ्यांना फाशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही निषेध व्यक्त करताना आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

आमदार प्रसाद लाड म्हणाले, 'भारतीय घटनेचे शिल्पकार, कायदेतज्ञ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थान राजगृहाची अज्ञातानी तोडफोड केली. हे निषेधार्य आहे. राजगृहावर तातडीने भिमराव आंबेडकर यांना भेट देऊन या विषयाची माहिती घेतली. या प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा व्हावी तसेच षडयंत्र रचणाऱ्यांना फाशी झाली पाहिजे.'

दरम्यान, मंगळवारी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या 'राजगृहा'ची दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहे. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतके महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. मंगळवारच्या घटनेनंतर देशभर निषेध व्यक्त होत आहे.

आमदार प्रसाद लाड बोलताना...

पोलीस या घटनेचा तपास करत असून कोणतीही अपरिचित घटना घडू नये म्हणून राज्यातील सर्व आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी. ‘राजगृह’ आपल्या सर्वांसाठी आदराचे ठिकाण आहे. माझे आपल्या सर्वांना आवाहन आहे की, आपण शांतता राखावी” असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

हेही वाचा -'राजगृहजवळ गर्दी करू नका, शांतता राखा'

हेही वाचा -देवेंद्र फडणवीसांनी केला राजगृहावरील हल्ल्याचा निषेध; आरोपींना अटक करत कडक कारवाईची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details