मुंबई :छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वादाच्या भोवऱ्यात सापडले असतानाच आता भाजप आमदार प्रसाद लाड (BJP MLA Prasad Lad) यांनीही कोकण महोत्सवामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात काल अजब वक्तव्य केले. यावरुन राष्ट्रवादीकडून टीका करण्यात आल्यानंतरप्रसाद लाडयांनी या संदर्भामध्ये दिलगिरी व्यक्त केली (Prasad Lad Apologizes) आहे.
Prasad Lad Apologizes : शिवरायांच्या वक्तव्याबाबत प्रसाद लाड यांची दिलगिरी, परंतु माफी नाही - शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान
भाजप आमदार प्रसाद लाड यांनी काल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले (controversial statement about Shivaji Maharaj) होते. त्यामुळे ते चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यांच्या या वकत्वव्यावर राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगीरी व्यक्त केली (Prasad Lad apologizes for controversial statement) आहे.
काय म्हणाले प्रसाद लाड :यावर बोलताना प्रसाद लाड म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस राजकारण करण्याचा प्रयत्न करते, त्याचा मी निषेध (controversial statement about Shivaji Maharaj) करतो. त्या कार्यक्रमांमध्ये बोलताना माझ्याकडून जी चूक झाली होती, ती मी सुधारली सुद्धा होती. हिंदवी स्वराज्याची स्थापना कोकणात झाली व जन्म शिवनेरीला झाला हे माझ्या बाजूला बसलेल्या संजय यादव यांनी सुद्धा तेव्हा लक्षात आणून दिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने करत आहे. त्याचा मी निषेध करतो. माझ्या शब्दाने जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. प्रसाद लाड यांनी या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली असली तरी सुद्धा, याप्रकरणी त्यांनी माफी मागायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात येत (Prasad Lad apologizes for controversial statement) आहे.
काय म्हणाले होते :स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी हे तुम्ही विचाराल, हिंदवी स्वराज्याची स्थापन छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा कोकणात झाला. यानंतर रायगडावर त्यांचे बालपण गेले, त्यांची सुरूवात कोकणात झाली, असे आमदार प्रसाद लाड यांनी म्हटल्यानंतर हा वाद निर्माण झाला होता. लाड यांच्या या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली (Prasad Lad controversial statement Shivaji Maharaj) होती.