मुंबई :काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशात अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात सुद्धा भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभला. परंतु या यात्रेत सहभागी होणाऱ्या कलाकारांवर आता विरोधकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या कलाकारांना पैसे देऊन आणले जाते, असा आरोप भाजपचे आमदार नितेश राणेयांनी केला (Rane Questioned on artists in Bharat Jodo Yatra) आहे.
MLA Nitesh Rane : भारत जोडो यात्रेत कलाकारांना पैसे देऊन आणले जाते का? नितेश राणे यांचा सवाल - नितेश राणे यांचा सवाल
भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) सहभागी होणाऱ्या कलाकारांवर आता विरोधकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या कलाकारांना पैसे देऊन आणले जाते, असा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला (Rane Questioned on artists in Bharat Jodo Yatra) आहे.

काय म्हणाले नितेश राणे?राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत दिसणारे कलाकार यांना पैसे देऊन आणले आहे का? असा एजन्सीला पाठवलेल्या मेसेजवरून सिद्ध होते, असे नितेश राणे म्हणाले आहेत. त्याचबरोबर मध्य प्रदेशमध्ये कुठला कलाकार राहुल गांधींबरोबर पंधरा मिनिटे चालू शकतो. त्यासाठी इतके पैसे द्यावे लागतील. असा संदेश सुद्धा भारत जोडो यात्रेकडून काही एजन्सीला पाठवला असल्याची माहिती मिळत आहे, असेही नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) म्हणाले आहेत.
सर्व नौटंकी :याबाबत पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले की, भारत जोडो यात्रेसाठी ही जी काही नौटंकी चालू आहे, हे पैशाच्या जोरावर सुरू आहे का? हे फार चुकीचे आहे. हे जे काही कलाकार येऊन भारत जोडो यात्रेत राहुल गांधीजी बरोबर पंधरा मिनिटे चालतात. त्यांना पाठिंबा देतात. हे सर्व कलाकार पैसे देऊन आणले आहेत का ? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे, असेही नितेश राणे (artists in Bharat Jodo Yatra) म्हणाले.