महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Patra Chawl Scam : स्वप्ना पाटकर यांच्या घरावर बाटल्या कोणी मारल्या; नितेश राणेंचा सवाल - Swapna Patkar

Patra chawl scam : पत्रा चाळ घोटाळ्यातील साक्षीदार असलेल्या स्वप्ना पाटकर (Swapna Patkar) यांना धमकी देण्यात आली आहे. धमकीचं पत्र त्यांच्या घराच्या आवारात फेकल्याचं त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे. याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नितेश राणे यांनी स्वप्ना पाटकर यांच्या घरावर बाटल्या कोणी मारल्या, असा सवाल उपस्थित केला आहे.

Nitesh Rane On Sanjay Raut
नितेश राणे आणि संजय राऊत

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 9, 2023, 6:20 PM IST

Updated : Nov 9, 2023, 6:26 PM IST

माहिती देताना नितेश राणे

मुंबई Patra Chawl Scam: मुंबईतील पत्राचाळ प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर (Swapna Patkar) यांच्या घरावर रात्री बाटल्या मारण्यात आल्या, त्याचबरोबर त्यांना धमकी देण्यात आली. याबाबत नितेश राणे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर प्रहार केला आहे. त्याचबरोबर फिल्म अभिनेता सुशांत सिंह राजपूत व दिशा सालियन मृत्यू प्रकरणात (Disha Salian Death) आदित्य ठाकरे यांच्यावरही आरोप केले आहेत. मुंबईत प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

त्या व्यक्तीचा शोध घेणार : याप्रसंगी बोलताना नितेश राणे म्हणाले की, पत्राचाळ प्रकरणात स्वप्ना पाटकर या साक्षीदार आहेत. त्यांच्या घरावर रात्री एक वाजता बाटल्या मारल्या गेल्या. तसंच त्यांना धमकी दिली गेली की "तू जास्त टिवटीव करते तुला कोण वाचवणार?" असं धमकीचं पत्र त्यांना दिलं गेलं आहे. या त्याच स्वप्ना पाटकर आहेत, ज्यांना शिव्या देताना संजय राऊत यांची एक क्लिप व्हायरल झाली होती. सध्या स्वप्ना पाटकर यांच्या घरात भीतीचं वातावरण आहे, त्याला जबाबदार कोण? सुजित पाटकर यांना अटक झाली, ते संजय राऊत यांचे भागीदार आहेत. या प्रकरणात आता संजय राजाराम राऊत बोलणार का? माझा यात काही सबंध नाही. परंतु मी स्वतः यासंबधी पाठपुरावा करणार आहे. तसंच मी स्वतः त्या महिलेच्या कुटूंबाला भेट देणार आहे. असं जर कुणी महिलेला धमकावत असेल तर त्या व्यक्तीला आम्ही सोडणार नाही.



माझ्यावर ५० कोटींचा दावा ठोका : नितेश राणे पुढे म्हणाले की, असाच प्रकार दिशा सालीयनबाबत झाला आहे. दिशा सालीयन आणि सुशांत सिंह राजपूत यांच्याबाबतची केस अद्याप सुरू आहे. आदित्य ठाकरे आणि रियाचे चाट समोर आले आहेत. ही माहिती या प्रकरणातील याचिकाकर्ते यांनी दिली आहे. हा कुठलाही राजकीय आरोप नसल्याचं राणे यांनी सांगितलं. तसंच या प्रकरणातील याचिकाकर्त्याला उद्धव ठाकरे यांच्याकडून ५० खोक्याची ऑफर दिली होती. जर ही माहिती खोटी असेल तर तुम्ही आमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोका, असं आव्हान त्यानी दिलं.



आदित्य ठाकरे यांच्यासाठी कार्यक्रम: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) त्याचबरोबर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा आवाज छान असून त्यांचा एक कार्यक्रम ठेवणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावर बोलताना नितेश राणे म्हणाले आहेत की, आदित्य ठाकरे पुरुष असताना महिलेच्या आवाजात गाऊ शकतात, हे टॅलेंट त्यांच्यात आहे. त्यांच्यासाठी मी हवा तर नागपूर अधिवेशनात एक कार्यक्रम लावतो, अशी टीकाही नितेश राणे यांनी केली आहे.

Last Updated : Nov 9, 2023, 6:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details