मुंबई :आमदार नमिता मुंदडा म्हणाल्या की, महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज मला खूप आनंद होतोय, की मी आज दोन महिन्याच्या बाळाला घेऊन विधानभवनात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पहिल्यांदाच हिरकणी कक्ष विधानभवनात सुरू केला आहे. माझे हे दुसरे बाळ आहे. अगोदर तीन वर्षाची मुलगी आहे. माझ्या पहिल्या मुलाच्या वेळेला हिरकणी कक्ष उपलब्ध नव्हते. मात्र आता हिरकणी कक्ष उपलब्ध झाला आहे. प्रश्न उपस्थित करायची संधी यामुळे मला उपलब्ध होणार आहे. राहुल नार्वेकरांमुळे ही संधी मला मिळाली त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते.
हिरकणी कक्ष सुरू :विधानभवनात हिरकणी कक्ष उभारण्यात यावा, यासाठी गेल्या अधिवेशनापासून विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्यासोबत चर्चा सुरू होती. मागच्या अधिवेशन वेळेला मला अधिवेशनात माझ्या प्रभागातील मुद्दे मांडणे संधी मिळाली नव्हती. या वेळेला तुम्ही ही संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली होती. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सुरू केला. कोणत्याही सोयी सुविधा त्यात नव्हत्या. हे चुकीचे आहे. विधिमंडळाच्या ही बाब निदर्शनात आल्यानंतर तात्काळ या ठिकाणी सर्व सोयीय़ुक्त हिरकणी कक्ष सुरू केले आहे. मी पाहणी केली.
शासकीय कार्यालयात हिरकणी कक्षाची गरज : डॉक्टरपासून सगळ्या गोष्टी येथे उपलब्ध झाल्या. हा प्रश्न केव्हा माझा नसून कोणत्याही क्षेत्रात महिला काम करतात, त्या ठिकाणी हिरकणी कक्ष उभारण्यात यायला हवे. शासकीय कार्यालयात हिरकणी कक्ष उभारण्याची गरज आहे. मंत्रालयात देखील कित्येक महिला काम करतात, त्या ठिकाणी देखील हिरकणी कक्ष असायला हवे. त्यासाठी माझे प्रयत्न सुरू राहतील. महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यालयात हिरकणी कक्ष असावे, यासाठी मी लवकरच लक्षवेधी मांडणार असल्याचे मुंदडा म्हणाल्या.
हिरकणी कक्षाची आवश्यकता :यापूर्वी हिरकणी कक्षाची आवश्यकता होती का? माहित नाही. मात्र, जेव्हा गरज आहे तेव्हा आम्ही आवाज उठवला. हिरकणी कक्ष उपलब्ध झाले आहेत. आमची पुढील मागणी आहे की, प्ले एरिया करून द्यायला हवे, अशी मागणी मुंदडा यांनी केली. तसेच यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्या म्हणाल्या. विधान भवनात या वेळेला लक्षवेधी फक्त महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. चांगला उपक्रम आहे. त्यामुळे मी आनंदी देखील आहे. मात्र केवळ महिला दिन आहे, म्हणून एकाच अधिवेशनात नको तर प्रत्येक अधिवेशनात महिलांसाठी असा एक दिवस राखीव राहायला हवा.
हेही वाचा : Sanjay Raut: चोर हा शब्द त्या विशिष्ट गटासाठी अतिशय योग्य, राऊत विधानावर ठाम