मुंबई - नांदेडमध्ये टाळेबंदी असल्याने होळीनंतर निघणाऱ्या शीख समाजाचा हल्लाबोल मिरवणुकीला परवानगी देण्यात आली नव्हती. तसेच सर्व धर्मगुरू यांच्याशी चर्चा करून मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत तसेच गुरुद्वारामध्ये हा उत्सव करण्याचे ठरवले होते. मात्र, काही जणांनी वाद घालत पारंपारिक मार्गाने मिरवणूक काढण्याचा आग्रह धरत पोलिसांवरच हल्ला चढवला. या सगळ्या प्रकरणावर ते भाजपचे नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी या घटनेचा निषेध करत सरकारने व पोलिसांनी दडपशाही केल्याने हा असंतोष उफाळून आल्याचेही ते म्हणाले.
अतुल भातखळकर म्हणाले, पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा भारतीय जनता पक्ष निषेध करत आहे. शब-ए-बारातच्या कार्यक्रमाला कोरोनाचे नियम पाळून परवानगी द्यायची आणि हिंदू समाजाच्या किंवा शीख धर्मीयांच्या कार्यक्रमावर बंदी घालायची हा या सरकारचा हिंदूविरोधी अजेंडा दिसून येतो. त्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन कोरोनाच्या परिस्थितीमध्येही त्या संदर्भातीस निर्णय राज्य सरकारला करता आला असता. पण, राज्य सरकारने व पोलिसांनी केलेल्या दडपशाहीमुळे हा असंतोष उफाळून बाहेर आला आहे.
नेमकं प्रकरण काय झालं होतं...?