महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'हे सरकार आहे की सर्कस आहे' - अतुल भातखळकर - वडेट्टीवर अनलॉक

भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणतात, मंत्री घोषणा करतात निर्बंध हटवणार, एका तासाने शासन निर्णय जाहीर होतो, तसं काही नाही हो..हे सरकार आहे की सर्कस? सर्कसमध्ये किमान रींगमास्टर तरी असतो, मात्र या सरकारमध्ये तर तेही नाही. सरकारच्या या पोरखेळामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचं नुकसान होतंय, हे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, असंही भातखळकर म्हणाले. राज्यातील शेतकरी, कर्मचारी, कामगार हतबल असून आर्थिक संकटात आहेत. तर, दुसरीकडे राज्यातील मंत्री श्रेयवादात गुंग आहेत.

atul bhatkhalkar news ,  unlock maharashtra ,  maharashtra lockdown ,  अतुल भातखळकर ,  अतुल भातखळकर लेटेस्ट न्यूज ,  वडेट्टीवर अनलॉक
अतुल भातखळकर

By

Published : Jun 4, 2021, 9:28 AM IST

मुंबई -राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती राज्याच्या मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांनी दिली तर काही वेळातच जनसंपर्क विभागाकडून निर्बंध शिथिल केल्याचा संदेश येत आहे. शासनाच्या याच गोंधळावरुन भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर चांगलीच टीका केली आहे. त्याचबरोबर 'हे सरकार आहे की सर्कस' असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणतात, मंत्री घोषणा करतात निर्बंध हटवणार, एका तासाने शासन निर्णय जाहीर होतो, तसं काही नाही हो..हे सरकार आहे की सर्कस? सर्कसमध्ये किमान रींगमास्टर तरी असतो, मात्र या सरकारमध्ये तर तेही नाही. सरकारच्या या पोरखेळामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचं नुकसान होतंय, हे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, असंही भातखळकर म्हणाले. राज्यातील शेतकरी, कर्मचारी, कामगार हतबल असून आर्थिक संकटात आहेत. तर, दुसरीकडे राज्यातील मंत्री श्रेयवादात गुंग आहेत.

अतुल भातखळकर

दरम्यान, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातला लॉकडाऊन पाच टप्प्यांमध्ये हटवण्यात येणार आहे, अशी घोषणा केली. वडेट्टीवार यांनी यासंदर्भातली संपूर्ण माहिती पत्रकार परिषदेत सादर केली. मात्र, त्यानंतर काही वेळातच सरकारच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आलं की, राज्यातले कोणतेही निर्बंध शिथिल झालेले नाहीत. नव्या नियमांचा प्रस्ताव अद्याप विचाराधीन आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन की अनलॉक असा संभ्रम निर्माण झाला आहे. यावरुनच आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details