महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनेने बाळासाहेबांचा अभिमान पायदळी तुडवला, अतुल भातखळकरांचा निशाणा - sharad pawar news

खा. संजय राऊत यांनी सामनासाठी शरद पवारांची मुलाखत घेतली. या मुलाखतीवर भाजपाकडून टीका होत आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अभिमान पायदळी तुडवण्याचे धोरण शिवसेनेचे असल्याची टीका भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली.

Bjp mla Atul Bhatkhalkar criticism on shivsena in mumbai
शिवसेनेने बाळासाहेबांचा अभिमान पायदळी तुडवला, अतुल भातखळकरांचा निशाणा

By

Published : Jul 11, 2020, 4:24 PM IST

मुंबई - 'एक शरद सगळे गारद' या मथळ्याने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीवर भाजपाकडून टीका होत आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अभिमान पायदळी तुडवण्याचे धोरण शिवसेनेचे असल्याची टीका भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली.

शिवसेनेने बाळासाहेबांचा अभिमान पायदळी तुडवला, अतुल भातखळकरांचा निशाणा
संजय राऊत यांनी रिमोट कंट्रोल सरकार बाबतीत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, लोकशाहीत रिमोट कंट्रोल चालत नाही. लोकशाहीत सरकार चालते, जिथे लोकशाही नाही तिथे रिमोट चालतो. नेमक्या रिमोट कंट्रोलच्या संदर्भात भाजपा नेते भातखळकर यांनी बोट ठेवले आहे. शिवसेनाप्रमुखांना त्यांच्या रिमोट कंट्रोल सरकारविषयी अभिमान होता. याचा दाखला देताना भातखळकर म्हणाले की, 1995 साली भाजपा- शिवसेना युतीचे सरकार असताना मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर नाराजी व्यक्त करताना शिवसेनाप्रमुख म्हणाले होते की, माझा रिमोट बिघडलेला नाही, तर टीव्ही बंद पडला आहे. आता शिवसेनाप्रमुख हयात असते तर त्यांनी यावेळी महाआघाडी सरकारला याच भाषेत सुनावले असते, असेही भातखळकर म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details