मुंबई Ashish Shelar Criticizes Aditya Thackeray :भाजपाचे आमदार आशिष शेलार म्हणाले की, शाळेतील बडबड गीते सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का, अशी म्हणण्याची ज्यावेळी बालबुद्धी आणि वय असतं त्या व्यक्तीने राजकारणावर सरकारला प्रश्न केले आहेत. त्यानंतर जे होतं ते आदित्य ठाकरे तुमचं झालं आहे असा शेलार यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला. स्वतःचा गृहपाठ केलाच नाही मात्र ज्यांना पाठ करायला दिला त्यांनी योग्य सल्ला दिला नसल्यामुळे तुमची अडचण झाली आहे. जपान सरकारनं स्वखर्चाने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सहा दिवसांच्या जपान दौऱ्यावर बोलवलं होतं. राज्य सरकारचा एकही रुपया खर्च न होता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपान दौरा यशस्वी केला आहे. त्यांनी आपल्या देशात आणि राज्यात नवीन तंत्रज्ञान, नवीन नोकऱ्यांची, संधी, नवीन रोजगारासाठीच्या टेक्नॉलॉजी आणि व्यवसाय कंपन्यांसोबत यशस्वीरित्या चर्चा केली.
नंतर फडणवीसांना प्रश्न विचारा :मुंबई शहर आणि उपनगरासाठी भविष्यासाठी जे आवश्यक होतं ते उपमुख्यमंत्री फडणीस यांनी आणलं आहे. वर्षानुवर्षे मुंबईत पडणारा पाऊस आणि तुंबणारी मुंबई यातून मुक्ती मिळण्यासाठी नवीन तंत्रज्ञान या दौऱ्यात चर्चा होऊन निर्णय होत आहे. मुंबई आणि उपनगरातील नागरिकांच्या दळवणाच्या सोयीसाठी मेट्रोचं जाळं वाढावं यासाठी दौऱ्यात आश्वासन मिळतं. म्हणून तुमच्या पोटात दुखत असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंवर आशिष शेलार यांनी केला आहे. गृहपाठ पूर्ण करा, अभ्यास करा आणि नक्की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना प्रश्न विचारण्याची भूमिका घ्या. तोपर्यंत गृहपाठ करा, असा सल्ला आशिष शेलारांनी आदित्य ठाकरे यांना दिला आहे.
आशिष शेलारांचे ट्विट :ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन परदेश दौऱ्यावरून महायुती सरकारला लक्ष्य केलं. त्यानंतर लगेचच सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून प्रतिक्रियांना सुरू झाली आहे. भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी तर जपान सरकारकडून दौऱ्या संदर्भात देण्यात आलेलं निमंत्रण पत्र ट्विटरवर पोस्ट केलं आहे.