मुंबई - मेट्रोच्या आरे कारशेडचा मुद्दा विधानसभेत गाजत असून बाल हट्टापायी जनतेवर कराचा बोजा लादला जातोय का? असा सवाल करत भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. तारांकित प्रश्नात शेलार यांनी आरे कारशेडचा प्रश्न सरकारला विचारला होता. यावर ते बोलत होते.
बाल हट्टापायी जनतेवर कराचा बोजा लादला जातोय का? शेलारांचा शिवसेनेला सवाल
तत्कालीन महायुती सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक गोष्टींना ध्यानात घेऊन आरेमध्ये मेट्रो कारशेडची जागा निश्चित केली होती. मात्र, पर्यावरण ऱ्हासाचा मुद्दा पुढे करत या कारशेडला स्थगिती देण्यात आली. पण आरेपेक्षा मुंबईत कोणतीही जागा योग्य नसल्याचे पुढे आले आहे. केवळ बाल हट्टासाठीच कारशेडला स्थगिती देण्यात येतेय का? असा टोला त्यांनी आदित्य ठाकरेंचे नाव न घेता लगावला आहे.
शेलार म्हणाले की, मेट्रोच्या आरे कारशेडला स्थगिती दिली असल्याने सरकारवर दररोज पाच कोटी रुपयांचा भुर्दंड पडत आहे. हा भुर्दंड सरकार जनतेकडून कररूपाने वसूल करणार आहे. आरे कारशेडसाठी सरकारने स्थापन केलेल्या समितीचा निर्णय आला आहे का? असा सवालही यावेळी विचारला. त्यावेळी कारशेडबाबत समितीचा अहवाल आल्याचे लेखी कळवण्यात आले असल्याचे सांगितले. मात्र, कारशेड का होत नाही याबाबत सरकारने खुलासा केला नाही, असे शेलार म्हणाले.
तत्कालीन महायुती सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक गोष्टींना ध्यानात घेऊन आरेमध्ये मेट्रो कारशेडची जागा निश्चित केली होती. मात्र, पर्यावरण ऱ्हासाचा मुद्दा पुढे करत या कारशेडला स्थगिती देण्यात आली. पण आरेपेक्षा मुंबईत कोणतीही जागा योग्य नसल्याचे पुढे आले आहे. केवळ बाल हट्टासाठीच कारशेडला स्थगिती देण्यात येतेय का? असा टोला त्यांनी आदित्य ठाकरेंचे नाव न घेता लगावला आहे. तसेच कारशेडला उशीर होत असल्याने दररोज सरकारला पाच कोटी रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने केवळ बाल हट्टासाठीच मेट्रोच्या आरे कारशेडला स्थगिती दिली असल्याचा आरोप देखील शेलार यांनी केला.