महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत भाजपचे 'महाराष्ट्र बचाव' आंदोलन, फडणवीस यांच्यासह शेलार यांची उपस्थिती

कोरोनाच्या संकटकाळात महाविकास आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरले असल्याचा आरोप करत या विरोधात भाजपच्यावतीने आज (शुक्रवार) राज्यभर 'मेरा आंगण मेरा रणांगण महाराष्ट्र बचाव' हे आंदोलन करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज मुंबईतील भाजप कार्यालयात हे आंदोलन करण्यात आले.

bjp maharashtra bachao andolan in mumbai
मुंबईत भाजपचे महाराष्ट्र बचाव आंदोलन, फडणवीस यांच्यासह शेलार यांची उपस्थिती

By

Published : May 22, 2020, 3:34 PM IST

मुंबई- कोरोनाच्या संकटकाळात महाविकास आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरले असल्याचा आरोप करत या विरोधात भाजपच्यावतीने आज (शुक्रवार) राज्यभर 'मेरा आंगण मेरा रणांगण महाराष्ट्र बचाव' हे आंदोलन करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज मुंबईतील भाजप कार्यालयात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप नेते आशिष शेलारही उपस्थित होते.

मुंबईत भाजपचे महाराष्ट्र बचाव आंदोलन

यावेळी बोलताना देवेंद्र फडणीस म्हणाले, 'राज्यभरात महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते काळे वस्त्र परिधान करुन किंवा काळ्या पट्ट्या हाताला बांधत आपापल्या घराबाहेर येऊन राज्य सरकारचा निषेध नोंदवत आहेत.'

संकट काळात आपल्याला राजकारण करायचे नाही. परंतु कोरोनाचे संकट सातत्याने वाढत आहे. तेव्हा अशा वेळी मौन बाळगणे योग्य नसते. कोरोना संकटात महाराष्ट्रातील जनतेला दिलासा मिळावा, यासाठी महाविकास आघाडी सरकारने अद्याप कोणतेही पॅकेज जाहीर केलेले नाही. त्यांनी केंद्राप्रमाणे पॅकेज जाहीर करावे. बारा बलुतेदार आणि कामगारांसाठी ५० हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची राज्य सरकारने घोषणा करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

हेही वाचा -वृक्ष छाटणीची परवानगी मिळणार ऑनलाईन.. महापालिकेने विकसित केले 'MCGM 24x7' अ‌ॅप

हेही वाचा -'भाजपसोबत जाऊन आपण महाराष्ट्रद्रोह तर करत नाही ना? जनतेने विचार करावा'

ABOUT THE AUTHOR

...view details