महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यातील पंचायत समिती निवडणुकीमध्येही भाजपला धोबीपछाड; महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार - nagpur

पालघर -8, धुळे-4 , नंदुरबार-6 , अकोला- 7, वाशिम-6 , नागपूर -13 अशा एकूण 44 पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. 44 पंचायत समितींच्या या निवडणुकीतील एकूण 664 जागेपैकी भाजपने सर्वाधिक 194 जिंकल्या आहेत. असे असले तरी प्रत्यक्षात मात्र, महाविकास आघाडीच्या फार्म्युल्यामुळे पंचायत समितीवर सत्ता राखण्यात भाजपला यश मिळाले नाही. यामध्ये भाजप पाठोपाठ काँग्रेस - 145, शिवसेना -117, राष्ट्रवादी- 80 जागांवर विजय मिळवला आहे.

राज्यातील पंचायत समिती निवडणुकीमध्येही भाजपला धोबीपछाड; महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार
राज्यातील पंचायत समिती निवडणुकीमध्येही भाजपला धोबीपछाड; महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार

By

Published : Jan 8, 2020, 11:06 PM IST

मुंबई - राज्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचे निकाल बुधवारी जाहीर झाले. यामध्ये 6 जिल्हा परिषदा व 44 पंचायत समितीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. या निकालाच्या आकड्यावरून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली असून भाजपला अनेक ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

पालघर -8, धुळे-4 , नंदुरबार-6 , अकोला- 7, वाशिम-6 , नागपूर -13 अशा एकूण 44 पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. 44 पंचायत समितींच्या या निवडणुकीतील एकूण 664 जागेपैकी भाजपने सर्वाधिक 194 जिंकल्या आहेत. असे असले तरी प्रत्यक्षात मात्र, महाविकास आघाडीच्या फार्म्युल्यामुळे पंचायत समितीवर सत्ता राखण्यात भाजपला यश मिळाले नाही. यामध्ये भाजप पाठोपाठ काँग्रेस - 145, शिवसेना -117, राष्ट्रवादी- 80 जागांवर विजय मिळवला आहे. राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्याप्रमाणे महाविकास आघाडीचे हा फॉर्म्युला स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्ता स्थापनेसाठी वापरात आणल्यास 44 पैकी बहुतेक पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार आहे.

पालघर जिल्ह्यतील आठ पंचायत समिती निकाल पाहता या ठिकाणीही भाजपला पराभवला सामोरे जावे लागले आहे. येथील ८ पंचायत समितीमध्ये जव्हार सोडता, अन्य 7 पंचायत समितीमध्ये भाजपला सत्तास्थापन करता येणार नाही. जव्हार पंचायत समितीमध्ये एकूण 8 जागांपैकी भाजपने 4 जागा जिंकल्या आहेत. त्यामध्ये तलासरी - माकप, डहाणूमध्ये - राष्ट्रवादी सगळ्यात मोठा पक्ष मात्र, महाविकास आघाडीची सत्ता येऊ शकते. पालघर पंचायत समितीमध्ये शिवसेना 23 जागा जिंकून मोठा पक्ष ठरल्याने या ठिकाणी शिवसेनेची सत्ता स्थापन होऊ शकते. तर वसई पंचायत समितीमध्येही भाजपला सत्तेपासून दूर ठेवता येणे शक्य आहे. या ठिकाणी शिवसेना 03, बविआ 03, भाजप 02 जागा मिळाल्या आहेत.

जिल्ह्यातील विक्रमगड पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीने सर्वाधिक ४ जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेला एक आणि भाजपला 2 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या फॅक्टर वापरून राष्ट्रवादीची सत्ता स्थापन होऊ शकते. राष्ट्रवादी 04, शिवसेना 01,भाजप 02, माकपा 01, अपक्ष- 02, वाडा मोखाडा पंचायत समितीमध्येही भाजप शिवसेना - राष्ट्रवादीची मुसंडी दिसून येत आहे.

नंदुरबारमध्ये 3 जागांवर महाविकास तर 3 जागांवर स्थानिक राजकीय तडजोड-

नंदुरबार जिल्ह्यातील 6 पंचायत समितीचे निकाल आज हाती आले आहेत. त्यामध्ये 3 जागांवर महाविकास आघाडी सत्ता स्थापन करू शकते. तर तळोदा, शहादा, नंदुरबार पंचायत समितीमध्ये स्थानिक राजकीय आकड्यांची जुळवाजुळवीवर सत्ता स्थापनेचे गणित अवलंबून असणार आहे.

नागपूर जिल्ह्यातील 13 पंचायत समितीतही भाजप सत्तेपासून वंचितच; महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार

नागपूर जिल्ह्यातील १३ पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. त्यामध्ये एकूण 116 जागेपैकी भाजपने 25 जागेवर विजय मिळवला आहे. तर 57 जागेवर विजय मिळवत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर राष्ट्रवादीने 21 जागा आणि शिवसेना 7, अपक्ष 4 जागांवर विजयी झाले आहेत. नरखेड पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीने 8 पैकी 8 जागा जिकंत सत्ता स्थापन केली आहे. काटोल मध्ये भाजप 1, राष्ट्रवादी 4 आणि इतर 1 जागेवर विजयी झाली आहे. कळमेश्वर पंचायत समितीत 6 जागा जिंकत काँग्रेसची सत्ता स्थापन झाली आहे. सावनेर आणि पारसिवणी पंचायत समितीतही काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. तसेच रामटेक,मौदा, कामटी, नागपूर ग्रामीण, हिंगणा, उमरेड, कुही, भिवापूरमध्येही काँग्रेस सत्ता स्थापनेची दावेदार ठरू शकते. भाजपच्या दिग्गज नेते असलेल्या आणि संघ भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यातच भाजपला एकही(अपवादात्मक) पंचायतसमिती जिकंता आली नाही, हे विशेष आहे.

अकोला जिल्हा पंचायत समिती निकाल एकूण जागा 7

अकोला जिल्हातील 7 पंचायत समितीचे निकाल स्पष्ट झाले या ठिकाणी एकूण 106 जागांपैकी 13 जागेवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. या ठिकाणी भारिप सर्वाधिक जागांवर विजयी झाले आहेत. त्यामुळे अकोला जिल्हा परिषदेसह पंचायत समितीमध्येही भारिपचे वर्चस्व दिसून येत आहे. मात्र, या जिल्ह्यात जिल्हा परिषदेसह पंचायत समितीमध्ये भाजपला सत्तेपासून वंचित राहावे लागणार आहे. तसेच महाविकास आघाडीचाही फॅक्टर अपवादात्मक पंचायत समिती सोडल्यास सर्वच ठिकाणी भारिपचा झेंडा फडकण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

वाशिम जिल्ह्यातील पंचायत समितीवर महाविकास आघाडीची सत्ता

या ठिकाणी 104 जागेपैकी, भाजपने 24 जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेस- 16, राष्ट्रवादी-23, शिवसेना- 13 आणि अन्य -22 जागेवर उमेदवार विजयी आहेत. या ठिकाणीही भाजपला सत्तेपासून वंचित राहावे लागणार आहे.

धुळ्यात जिल्हा परिषदेसह पंचायत समितीमध्ये भाजपचे वर्चस्व

धुळे जिल्हा परिषदेवर झेंडा फडकलेल्या भाजपने येथील 4 पंचायत समित्यामध्ये एकूण 112 जागांपैकी 70 जागेवर विजय मिळवला आहे.

पंचायत समिती निकालाची आकडेवारी-

एकूण जागा: 664

भाजपा: 194

काँग्रेस: 145

राष्ट्रवादी काँग्रेस: 80

शिवसेना: 117

अन्य: 128

ABOUT THE AUTHOR

...view details