महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजप नेते उद्या राज्यपालांना भेटणार, सत्ता स्थापनेचा करणार दावा? - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

चंद्रकात पाटील आणि मी उद्या राज्यपालांना भेटणार आहोत. आम्ही पहिल्या दिवसापासून महायुतीचाच विचार करत आहे. महायुतीशिवाय कोणताही अन्य विषयाला शिवले नाही. सरकार आमचेच येईल, यात कसलीही शंका नाही, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

सुधीर मुनगंटीवार

By

Published : Nov 6, 2019, 5:48 PM IST

Updated : Nov 6, 2019, 8:07 PM IST

मुंबई- महाराष्ट्राचा जनादेश महायुतीला आहे. उद्या आम्ही राज्यपालांना भेटायला जाणार आहोत. राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होईल. तसेच 31 डिसेंबरपूर्वी भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची निवडही होईल, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपल्यानंतर माध्यमांशी मुनगंटीवार बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

भाजप नेते उद्या राज्यपालांना भेटणार

चंद्रकात पाटील आणि मी उद्या राज्यपालांना भेटणार आहोत. आम्ही पहिल्या दिवसापासून महायुतीचाच विचार करत आहे. महायुतीशिवाय कोणताही अन्य विषयाला शिवले नाही. सरकार आमचेच येईल, यात कसलीही शंका नाही. चांदा ते बांदा आणि मुनगंटीवार ते केसरकर या सगळ्यांनी महायुतीत निवडणूक लढवली आहे. प्रत्येक पाऊल हे महायुतीचे सरकार यावे, यासाठीच पुढे जात आहे, असे मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

Last Updated : Nov 6, 2019, 8:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details