महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात कुठेही लस निर्मिती प्रकल्प झाला तरी आनंदच - अजित पवार - bharat Biotech Vaccine Production Pune

भारत बायोटेकचा लसनिर्मिती प्रकल्प पुणे, नागपूरसह राज्यात कुठेही झाला असता तरी मला आनंदच झाला असता. त्यामुळे ‘भारत बायोटेकचा प्रकल्प अजित पवारांनी पुण्याला पळवला’ हा भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा आरोप खोटा, जनतेची दिशाभूल करणारा आहे, असा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

mla Krishna Khopde allegations false says Ajit Pawar
भारत बायोटेक लस निर्मिती पुणे अजित पवार स्पष्टीकरण

By

Published : May 17, 2021, 9:36 PM IST

मुंबई - भारत बायोटेकचा लसनिर्मिती प्रकल्प पुणे, नागपूरसह राज्यात कुठेही झाला असता तरी मला आनंदच झाला असता. त्यामुळे ‘भारत बायोटेकचा प्रकल्प अजित पवारांनी पुण्याला पळवला’ हा भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा आरोप खोटा, जनतेची दिशाभूल करणारा, औट घटकेच्या प्रसिद्धीसाठी, राजकीय सनसनाटी निर्माण करण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे, असा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

हेही वाचा -मुख्यमंत्र्यांनी वॉर रुममध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्याची गरज - प्रवीण दरेकर

पुण्याच्या हवेली तालुक्यातील मांजरी येथील जागा भारत बायोटेक कंपनीला कोरोना लसनिर्मिती प्रकल्पासाठी देण्याचे खुद्द मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन होईल हे पाहण्याची जबाबदारी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी पार पाडल्याचे ते म्हणाले.

न्यायालयाच्या आदेशाचे पालन

देशावरील कोरोना संकट आणि लसनिर्मितीची गरज लक्षात घेऊन भारत बायोटेक लस उत्पादक कंपनीने स्वत:हून पुण्यात लसनिर्मिती प्रकल्पासाठी जागा मिळावी, अशी मागणी केली होती. त्यासाठी, भारत बायोटेकने मांजरी येथील बंद पडलेल्या ‘इंटरवेट इंडिया प्रा लि.' कंपनीची जागा मिळावी, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला होता. त्या प्रस्तावावर तातडीने निर्णय व्हावा म्हणून भारत बायोटेकने उच्च न्यायालयात धाव घेतली व दाद मागितली. उच्च न्यायालयाने कोरोनाचे संकट व लसनिर्मितीची गरज लक्षात घेऊन पुण्याच्या हवेली तालुक्यातील मांजरी येथे भारत बायोटेकचा प्रकल्प सुरू करण्याचे निर्देश दिले. राज्याचा उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून न्यायालयाच्या आदेशाचे पालन सुनिश्चित करण्याची जबाबदारी मी पार पाडली, असे अजित पवार म्हणाले.

भाजपने दिशाभूल करू नये

कोरोनापासून नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी भारत बायोटेकचा लसनिर्मिती प्रकल्प तातडीने सुरू होणे गरजेचे आहे. लस उत्पादनाची गरज आणि न्यायालयाचे आदेश लक्षात घेऊन भारत बायोटेकला राज्यात लसउत्पादन सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका प्रशासनाकडून पार पाडण्यात येत आहे. यामागे देशातील नागरिकांना कोरोनावरील लस लवकर उपलब्ध व्हावी हाच हेतू आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. तसेच, भाजपच्या लोकप्रतिनिधींनी खोटे बोलून नागरिकांची दिशाभूल करू नये, असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

चांद्यापासून बांध्यापर्यंत महाराष्ट्र एक

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात संपूर्ण महाराष्ट्र एकजुटीने लढत आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र एक असून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याचा, विभागाचा औद्योगिक, आर्थिक, पायाभूत विकासासाठी महाविकास आघाडी सरकार बांधील आहे. विरोधकांनी खोटे, तथ्यहिन आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न आता थांबावावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

हेही वाचा -नायर रुग्णालयाला तौक्ते चक्रीवादळाचा फटका; पावसामुळे कोविड ओपीडी, लसीकरण केंद्रात पाणी

ABOUT THE AUTHOR

...view details