मुंबई -अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीची सुई सध्या एका कथित सेलिब्रिटी पार्टीभोवती फिरते. भाजपकडून कथित पार्टी संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भाजप नेत्यांकडून सोशल मीडियावर आणि सरकारला पत्र लिहून सुशांतच्या आत्महत्येपूर्वी झालेल्या या कथित पार्टीचा काय संबंध आहे? याबाबत चौकशी व्हावी. तसेच हे प्रकरण सीबीआयकडे सोपवायला हे सरकार का घाबरत आहे? असा सवाल देखील भाजप नेते विचारत आहेत.
सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यासाठी ठाकरे सरकार घाबरत आहे का, भाजप नेत्यांचा सवाल
आज ठाकरे सरकारने सुशांतसिंह राजपूत प्रकरणात तपासासाठी बिहारहून आलेल्या पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाइन शिक्का मारला आणि त्यांना बसवले आहे. ठाकरे सरकार व मंत्री हे या प्रकरणात जो तपास सुरू आहे त्याला का घाबरत आहेत? हे प्रकरणाचा तपास सीबीआयने करायला हवा, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.
भाजप आमदार आशिष शेलार व भाजप नेते यांनी ट्वीटद्वारे रविवारी लॉकडाऊनच्या काळात अशा कथित सेलिब्रिटी पार्ट्या कोणाच्या आशीर्वादाने सुरू होत्या? असा सवाल उपस्थित केला. पुन्हा एकदा सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. तर भाजप आमदार अमित साटम यांनी झोन 9 चे डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांना पत्र लिहून सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाशी संबंधित काही प्रश्न विचारत सुशांतची मॅनेजर दिशा सॅलियनच्या आत्महत्येनंतर त्याला धमक्या आल्या होत्या का? सुशांतच्या घरी आत्महत्येच्या आदल्या रात्री पार्टी झाली होती का? त्यात कोण उपस्थित होते? त्याने सीमकार्ड का बदलली होती? अशा विविध प्रश्नांचा उलगडा करण्याची मागणी आमदार अमित साटम यांनी उपस्थित केले आहेत.
आज ठाकरे सरकार यांनी सुशांतसिंह राजपूत प्रकरणात तपासासाठी बिहारहून आलेल्या पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाइन शिक्का मारला आणि त्यांना बसवले आहे. ठाकरे सरकार व मंत्री हे या प्रकरणात जो तपास सुरू आहे त्याला का घाबरत आहेत? हे प्रकरणाचा तपास सीबीआयने करायला हवा, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.