महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'महाराष्ट्रात आणीबाणीची स्थिती, सरकारविरोधातील आवाज दडपण्याचा प्रयत्न निषेधार्ह' - republic tv editor arnab goswami arrest

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केल्यानंतर भाजप नेते विनोद तावडे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सरकार आणि सत्ताधारी पक्षांविरोधात मतप्रदर्शन करणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सध्या महाराष्ट्रात सुरू आहे, असे ते म्हणाले.

विनोद तावडे
विनोद तावडे

By

Published : Nov 5, 2020, 4:11 AM IST

मुंबई - सरकार आणि सत्ताधारी पक्षांविरोधात मतप्रदर्शन करणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. या घटना आणीबाणीचे स्मरण करून देणाऱ्या आहेत. या घटनांचा आपण तीव्र निषेध करतो, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी बुधवारी व्यक्त केली.

पालघर साधुंच्या हत्येचा जाब विचारल्याने अटक

अर्णब गोस्वामीच्या अटेकेचा भाजप नेते विनोद तावडे यांनी केला निषेध


रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेबाबत पत्रकारांशी बोलताना तावडे यांनी सांगितले की, ज्या आत्महत्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी बंद केला होता, त्याचा तपास पालघर येथे साधूंच्या हत्येवरून सरकारवर टीका केल्यामुळे पुन्हा सुरू केला गेला. पालघर येथे झालेल्या साधूंच्या हत्येबाबत आघाडी सरकारला जाब विचारल्यानेच अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली. गोस्वामी हे दोषी असतील तर त्यांच्यावर जरूर कारवाई व्हायला हवी. मात्र, पहाटे पाचला जाऊन त्यांना अटक केली गेली. यावरूनच हे सरकार सूडबुद्धीने काम करीत असल्याचे सिद्ध होत आहे.

आणीबाणी काळातल्या घटनांची आठवण

सत्ताधारी शिवसेना पक्षाच्या नेत्यांबद्दल समाज माध्यमातून मतप्रदर्शन करणाऱ्या निवृत्त नौदल अधिकाऱ्याला घरी जाऊन बेदम मारहाण करण्यात आली. एका मंत्र्याबद्दल टिप्पणी केली म्हणून मंत्र्याच्या बंगल्यात नेऊन तरुणाला मारहाण केली गेली, या सर्व घटना आणीबाणीत झालेल्या अत्याचाराचे, दडपशाहीचे स्मरण करून देणाऱ्या आहेत, असेही मा. तावडे यांनी नमूद केले.

ABOUT THE AUTHOR

...view details