महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रवादीच्या पडझडीमुळे अजित पवारांचा आमदारकीचा राजीनामा - सुधीर मुनगंटीवार - सुधीर मुनगंटीवार

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा दिला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी अचानक राजीनामा दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

सुधीर मुनगंटीवार

By

Published : Sep 27, 2019, 9:04 PM IST

Updated : Sep 27, 2019, 11:15 PM IST

मुंबई -राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर उलट सुलट चर्चेला उधान आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसची होत असलेली पडझड न बघवल्याने कदाचीत अजित पवार यांनी राजीनामा दिला असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी दिली आहे.

सुधीर मुनगंटीवार

हेही वाचा - LIVE: अजित पवार यांनी दिला आमदारकीचा राजीनामा; कारण गुलदस्त्यात

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे शुक्रवारी अजित पवार यांनी ईमेलद्वारे राजीनामा सादर केल्यानंतर त्यांनी तो तत्काळ मंजूर केला. मुनगंटीवार म्हणाले, ई़डीने (सक्तवसुली संचलानालय) अजित पवारांवर दाखल केलेला गुन्हा हे कारण असण्याचा काही प्रश्न येत नाही. कारण, ईडी असो की न्यायालय असो ते कधी लोकप्रतिनीधींसमोर झुकत नसतात. तसेच उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्यावर राजीनाम्याने दबाव आणता येत नाही. तुम्ही खासदार, आमदार किंवा मंत्री असा अशा प्रकारचा दबाव आणता येत नाही. आता तर अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने ते आमदारही नाहीत.

सहानभूतीच्या मुद्द्यावर बोलताना, मुनगंटीवर म्हणाले, सहानभूतीमुळे राजीनामा दिल्याचा मला वाटत नाही. कारण तसेही विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मात्र, आता अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा - ईडी कार्यालयात जाणार नाही, पोलीस अधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर शरद पवारांचा निर्णय मागे

Last Updated : Sep 27, 2019, 11:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details