महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 28, 2023, 3:27 PM IST

ETV Bharat / state

कॅगने उघड केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी एसआयटीमार्फत करा शेलार यांची मागणी

मुंबई महापालिकेच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे. या अहवालात ज्या कामांचा उल्लेख आहे, त्याची एसआयटीमार्फत चौकशी करावी. भाजप नेते आशिष शेलार यांनी ही मागणी केली आहे.

शेलार यांची मागणी
शेलार यांची मागणी

मुंबई - कॅगने केलेल्या चौकशीत मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कामांची अनेक प्रकारची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या कामांच्यामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाला असून सुमारे 8485 कोटींचा भ्रष्टाचार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संदर्भात एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

महालेखा परीक्षकांच्या अहवालामध्ये मुंबई महानगरपालिकेत झालेल्या अनेक कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपण या सर्व घोटाळ्याची चौकशी एसआयटीमार्फत करावी अशी मागणी करत असल्याचे भाजपचे मुंबई अध्यक्ष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

काय आहेत आरोप - यावेळी बोलताना अशी शेलार यांनी सांगितले की मुंबई महानगरपालिकेच्या नऊ विभागांमधील सुमारे 76 कामांमध्ये 12000 कोटींचा घोटाळा झाल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसते आहे. शहरात ही प्रचंड लुटमार चालली असून या सर्व प्रकाराचे वर्णन कट, कमिशन आणि कसाई असे करता येईल असे ते म्हणाले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच महापालिकेचे नेतृत्व होते. त्यांनी हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणाऱ्यांवर आता हा चित्रपट तयार करा असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

निविदाविना झाली कामे - मुंबई महानगरपालिकेतील अनेक कामे ही टेंडर शिवाय झाल्याची बाब मोठ्या प्रमाणात समोर आली आहे. रस्ते कसे तयार करावे यासाठी मुंबईमध्ये महापालिकेत एक येलो बुक आहे. बांधकामाबाबत राष्ट्रीय बांधकाम करणारे कोण आहे. टेंडरच्या बाबतीत काय करता येऊ शकते याची मार्गदर्शक पुस्तिका आहे. मात्र आता टेंडर कशा पद्धतीने बदलता येऊ शकतात आणि कसा भ्रष्टाचार करता येतो याचे पुस्तकच आदित्य ठाकरे यांनी लिहावे असा टोलाही त्यांनी लगावला. मुंबई महानगरपालिकेमध्ये कुठलीही निविदा न काढता सुरुवातीला दोन भागांमध्ये वीस, 214 कोटींची कामे टेंडर न काढताच दिली तर 4755 कोटींची 64 कामे दिलेल्या कंत्राटदारांसोबत करारच केला नाही. या सर्व प्रकाराची कसून चौकशी व्हावी आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करावी अशी आपण त्यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली असल्याचे शेलार यांनी सांगितले.

हेही वाचा - Mumbai Corona Update: सावधान! तीन नवजात बालकांना कोरोनाची बाधा झाल्याचा संशय; चाचणीसाठी पाठवले मुने

ABOUT THE AUTHOR

...view details