महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Corporation मुंबईत मलनिसारण वाहिनीच्या कामात अडथळा, भाजप माजी नगरसेवकाचे उपोषण - मुंबईत ठाकरे गटाचा विकास कामात अडथळा

महापालिकेच्या वतीने सुरू केलेल्या मलनिसारण वाहिनीच्या कामात शिवसेना ठाकरे ( Shiv Sena Thackeray Faction ) गटासह राष्ट्रवादी ( Nationalist Congress Party ) आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अडथळा आणला. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ( Mumbai Municipal Corporation Officer ) कंत्राटदाराला काम करण्यास मनाई केल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक विनोद मिश्रा ( Bjp Leader Vinod Mishra ) यांनी केला. या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी विनोद मिश्रा यांनी मुंबईत एकदिवसीय आंदोलन सुरू केले आहे.

Bjp Leader Vinod Mishra
भाजपचे माजी नगरसेवक विनोद मिश्रा

By

Published : Dec 20, 2022, 1:55 PM IST

मुंबई -मालाड (पूर्व), कुरार, एसबीआय बँक ते संतोषी माता मंदिरापर्यंत ( Santoshi Mata Temple Mumbai ) नवीन मलनि:सारण वाहिनी ( Sewage pipes In Mumbai ) टाकण्याचे काम बंद करण्यात आले आहे. त्यामुळे संतप्त झालेले भाजपचे माजी नगरसेवक विनोद मिश्रा ( Bjp Leader Vinod Mishra ) यांनी उपोषण सुरू केले आहे. या कामात वारंवार अडथळा आणला जात असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. विनोद मिश्रा यांनी पी उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तांना ( Mumbai Municipal Corporation Officer ) याबाबत लेखी पत्राद्वारे इशारा दिला होता. तसेच त्याची प्रत महापालिका आयुक्तांनाही दिलेली आहे.

भाजपचे माजी नगरसेवक विनोद मिश्रा पत्र

परवानगी घेऊन काम चालू -दिंडोशी मतदार संघ, प्रभाग क्र ४३ मध्ये एसबीआय बँक ते संतोषी माता मंदिरापर्यंत नवीन मलनि:सारण वाहिनी टाकण्याचे काम २०१९ मध्ये विनोद मिश्रा यांच्या प्रयत्नाने महापालिकेतर्फे चालू करण्यात आले होते. काम चालू झाल्यानंतर शिवसेना ( Shiv Sena Thackeray Faction ) ( उद्धव ठाकरे गट ), राष्ट्रवादी काँग्रेस ( Nationalist Congress Party ) , काँग्रेस तर्फे काम बंद करण्यात आले. पुन्हा काम चालू करण्यासाठी मनपा, राजकीय पक्ष आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत ( Mumbai Police Officer ) नर्मदा हॉलमध्ये चर्चा करण्यात आली. त्यानंतर काम चालू करण्यात आले. मान्सूनमुळे परत काम बंद करण्यात आले. मान्सून संपल्याने ठेकेदारानी उर्वरित काम चालू करण्याचे सांगितले. सर्व परवानगी घेण्यात आली, असेही मिश्रा यांनी सांगितले.

लाक्षणिक उपोषण -मलनिःसारण वाहिनी टाकण्याच्या कामाची सुरुवात १६ डिसेंबरला रात्री ११ वाजता करण्यात आली. काम चालू केल्यानंतर पुन्हा विविध राजकिय पक्ष शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्याकडून महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप मिश्रा यांनी केला. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ( Mumbai Municipal Corporation Officer ) ठेकेदारास काम करण्यास मनाई केली व कामही बंद केले, असेही मिश्रा यांनी यावेळी बोलताना सांगितले. लोकांच्या हिताचे काम शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस ( Nationalist Congress Party ) , काँग्रेस पक्षातर्फे बंद करण्यात आल्याचा आरोप मिश्रा यांनी केला. त्यासाठी मंगळवारी सकाळी काम बंद करणाऱ्या पक्ष व महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या ( Bjp Leader Vinod Mishra Protest Against Mumbai Corporation ) विरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तलावाजवळ एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत असल्याचेही मिश्रा यांनी यावेळी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details