महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ग्लोबल टेंडर काढून मुंबईकरांना लस देण्याचं खोटं चित्र उभारण्याचा राज्य सरकार, मुंबई महापालिकेचा प्रयत्न फसला - दरेकर

ग्लोबल टेंडर काढू, अशा प्रकारचा गाजावाजा मुंबई महापालिकेने केला होता, राज्य सरकारनेही त्याला परवानगी दिली. परंतु, त्यानंतर अधिकार नाहीत किंवा लस उपलब्ध होत नाही, अशा प्रकारे पळवाटा काढून आपलं अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न महापालिका करत आहे, अशी घणाघाती टीका विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

By

Published : Jun 2, 2021, 9:02 PM IST

प्रविण दरेकर
'ग्लोबल टेंडर काढून मुंबईकरांना लस देण्याचं खोटं चित्र उभारण्याचा राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेचा प्रयत्न फसला'

मुंबई - लसीकरणा संदर्भात राज्य सरकार आणि महानगरपालिका पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे. ग्लोबल टेंडर काढू, अशा प्रकारचा गाजावाजा मुंबई महापालिकेने केला होता, राज्य सरकारनेही त्याला परवानगी दिली. परंतु, त्यानंतर अधिकार नाहीत किंवा लस उपलब्ध होत नाही, अशा प्रकारे पळवाटा काढून आपलं अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न महापालिका करत आहे, अशी घणाघाती टीका विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

ग्लोबल टेंडर काढण्यात मुंबई महापालिका अपयशी ठरली
आज माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले, की मुळात ग्लोबल टेंडर काढण्याचा अधिकार होता की नाही, काढलं असेल तर त्या निकषांत कंपन्या बसतात का, प्रतिसाद मिळेल का, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. हे सर्व माहित असताना केवळ आम्ही ग्लोबल टेंडर काढून मुंबईकरांना लस उपलब्ध करून देतो आहोत, अशा प्रकारचं खोटं चित्र उभारण्याचा प्रयत्न राज्य सरकार किंवा मुंबई महापालिकाकडून झाला. परंतु आता मुंबई महानगरपालिका आणि सत्ताधारी पक्ष तोंडावर आपटला आहे. लसीकरण केंद्राची उभारणी केली, परंतु आजही लस मिळत नाही. त्यामुळे ग्लोबल टेंडर काढण्यात मुंबई महापालिका अपयशी ठरली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details