महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई महानगरपालिकाचा ग्लोबल टेंडरच्या नावाखाली दिखावा - प्रदीप कर्पे - Mumbai Municipal Corporation Global Tender for vaccination

मुंबईकरांचे लसीकरण करण्याची जबाबदारी ही मुंबई महानगरपालिकेची होती. परंतु ग्लोबल टेंडरच्या नावाखाली आत्तापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील एकही व्यक्तींच लसीकरण मुंबई महानगरपालिकेने केले नाही. मुंबईच्या महापौरांनी फक्त अरेरावीची भाषा केलेली आहे आणि नुसता पीआरवर खर्च केलेला आहे. नुसता कांगावा करणे हेच सत्ताधारी शिवसेना आणि महापौरांना जमत असल्याची टीका प्रदीप कर्पे यांनी केली.

Pradip Karpe criticize on Mayor Kishori Pednekar in mumbai
मुंबई भाजपा सचिव प्रदीप कर्पे यांची महापौर किशोरी पेडणेकरांवर टिका

By

Published : Jun 4, 2021, 12:44 PM IST

मुंबई - महापौर किशोरी पेडणेकर यांच्या या ट्विटवर एका नेटकऱ्याने त्यांना प्रश्न विचारला की, कुठल्या कंपन्यांना लस पुरवठ्याचं कंत्राट दिले आहे. यावर संतापलेल्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्याला मराठीत 'तुझ्या बापाला' असे उत्तर दिले. मुंबई महानगरपालिकेमधील शिक्षण समितीचे भाजपाचे सदस्य प्रतिक कर्पे यांनी पालिकेचा ग्लोबल टेंडरच्या नावाखाली दिखावा चालू असल्याचे महापौरांना खडे बोल सुनावले आहेत.

मुंबई भाजपा सचिव प्रदीप कर्पे यांची महापौर किशोरी पेडणेकरांवर टिका

नुसता कांगावा करणे हेच सत्ताधाऱ्यांना जमते -

मुंबईकरांचे लसीकरण करण्याची जबाबदारी ही मुंबई महानगरपालिकेची होती. परंतु ग्लोबल टेंडरच्या नावाखाली आत्तापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील एकही व्यक्तींच लसीकरण मुंबई महानगरपालिकेने केले नाही. मुंबईच्या महापौरांनी फक्त अरेरावीची भाषा केलेली आहे आणि नुसता PR वर खर्च केलेला आहे. नुसता कांगावा करणे हेच सत्ताधारी शिवसेना आणि महापौरांना जमत असल्याची टीका प्रदीप कर्पे यांनी केली.

संतापनंतर केले ट्वीट डिलीट -

सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दल महापौर पेडणेकरांविषयी संताप व्यक्त केला जात आहे. महापौरांनी अधिकृत ट्विटर हँडलवरुन केलेले ट्वीट नंतर डिलीट केले असले तरी, त्याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यानंतर त्या आक्षेपार्ह ट्विटवर किशोरी पेडणेकरांनी स्पष्टीकरण दिले आहे.

ट्विटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियात जोरदार व्हायरल -

महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर देताना वापरलेल्या या शब्दांमुळे त्यांची चांगलीच फजिती झाली. अखेर त्यांनी आपले हे ट्विट डीलिट केले. मात्र, असे असले तरी त्यांच्या या ट्विटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. तसेच महापौरांना चांगलेच ट्रोलही केले जात आहे.

हेही वाचा - ५० लाख लस खरेदी करणार, मोफत लसीसाठी गळा काढणाऱ्यांनी सेंटरवर जावं- मुंबई महापौर

ABOUT THE AUTHOR

...view details