मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. त्यांच्यावर भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी विविध आरोप केले आहेत. तर अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडले जाणार असल्याचा दावा त्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
अनिल परब यांचे साई रिसॉर्ट पडण्यासंदर्भात लवकरच नोटीस - किरीट सोमय्या साई रिसॉर्ट नो-डेव्हलपमेंट झोनमध्ये -
या संदर्भात सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पर्यावरण मंत्रालयाचे अधिकारी अनिल परब यांच्या साई रिसॉर्टला २ दिवसात भेट देणार आहेत. मी दिल्ली येथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कोस्टल झोन अॅथॉरिटीच्या प्राथमिक अहवालानुसार साई रिसॉर्ट एनडीझेड (नो-डेव्हलपमेंट झोन) मध्ये आहे. त्यामुळे साई रिसॉर्ट पाडले जाईल, असा मला विश्वास असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश -
सोमय्या यांच्या तक्रारीनंतर परब यांच्या साई रिसॉर्टच्या अनधिकृत बांधकामाबाबत वस्तुस्थिती काय आहे. याची खातरजमा करण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मुरुड तालुका दापोली येथील गट क्रमांक ४४६ येथील साई रिसॉर्ट एनेक्सचे बांधकाम बेकायदेशीर आहे. सीआरझेड कायद्याचे (law of CRZ) उल्लंघन केले असल्याचे सोमय्या यांनी म्हटले होते. फसवणूक, दस्तावेजात खाडाखोड, करत परब यांनी पदाचा दुरुपयोग केला, असल्याचा आरोप त्यांनी केला होता. सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनंतर साई रिसॉर्टच्या अनधिकृत बांधकामाबाबत वस्तुस्थिती काय आहे. याची खातरजमा करण्याचे आदेश रत्नागिरीच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, दापोली प्रांताधिकारी हे याबाबत चौकशी अधिकारी असून त्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - Manhole Horror उघड्या गटारात पडल्या २ महिला, बघा हृदयाचा थरकाप उडवणारं सीसीटीव्ही फुटेज