मुंबई - राज्यात महाविकास आघाडीतील अनेक नेते केंद्रिय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. अशात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गृहनिर्माण मंत्री जिंतेद्र आव्हाड यांच्यावर निशाना साधला आहे. एसआरएमध्ये गैरव्यवहार सुरु असून येथेही प्रविण कलमे हा 'नवा वाजे' उदयास आल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच दोघांचीही मुख्यमंत्र्यांनी हाकलपट्टी करावी, अशी मागणी सोमय्या यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत केली.
मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे का?
राज्य सरकारमधील 12 आमदार चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. या सर्वांची ईडीमार्फत सुरु आहे. कारवाईत ईडीने एसआरए प्रकल्प उभारणीला प्राधान्य देण्याची सूचना केली. गृहनिर्माण खात्यात जितेंद्र आव्हाड आणि प्रवीण कलमे ही जोडी वावरत आहे. जुलै 2022 मध्ये 100 टक्के लॉकडाऊन होता. 6 जुलै 2020 या दिवशी 81 आरटीआय टाकले जातात. गृहनिर्माण मंत्र्यांकडून कारवाईचे आदेश देतात. कोरोना काळातही आव्हाड यांच्याकडून प्रवीण कलमे यांच्या अर्जावर सही केली जाते. 62 एसआरए प्रकल्पाची पाहणी कलमे याने सुरू केली. प्रवीण कलमे हा जितेंद्र आव्हाडांचा सचिन वाझे आहे, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला. तसेच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा या वसुलीच्या जोडीला पाठिंबा आहे का? असा सवाल विचारला.
गृहनिर्माण मंत्र्यांची हकालपट्टी करा
एसआरएबाबतही काही कलकत्ता कंपन्याच्या मार्फत गुंतवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्र्यांनी हकालपट्टी करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केली.