महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kirit Somaiya on NCP : राष्ट्रवादी 'लव जिहाद'चे समर्थन करणार का? किरीट सोमय्या यांचा सवाल

'द केरला स्टोरी' चित्रपटावरून सुरू असलेले आरोप प्रत्यारोप आपण पाहत आहोत. मुस्लिम मतांसाठी द केरला स्टोरी चे निर्माते यांना फाशी दिली पाहिजे अशी मागणी करणारे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा मी निषेध करीत आहे. अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार डॉक्टर किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली आहे.

Kirit Somaiya
किरीट सोमय्या

By

Published : May 9, 2023, 7:06 PM IST

माहिती देताना किरीट सोमय्या

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून द केरला स्टोरी चित्रपटावरून वातावरण तापले आहे. बरेच राजकीय नेते यात वैयक्तिक रस दाखवत आहेत. द केरला स्टोरी या चित्रपटावरून जितेंद्र आव्हाड यांनी संबंधित चित्रपटाच्या निर्मात्यांना फाशी द्यावी अशी मागणी केल्यानंतर आक्रमक झालेल्या किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेस लव जिहादचे समर्थन करते का? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच या चित्रपटावर कोणीही बंदी घातली तरी आपण हा चित्रपट पुन्हा एकदा पाहणार असल्याचे, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले आहे.


मतांसाठी लव्ह जिहादचे समर्थन करणार का?: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी द केरला स्टोरी या चित्रपटाच्या निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना फाशी देण्याची मागणी केल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना सोमय्या म्हणाले की, मुस्लिम मतांसाठी आपण लव्ह जिहाद आणि आतंकवाद याचे आपण समर्थन करणार का? हा माझा शरद पवार उद्योग आणि महाविकास आघाडीला प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया यांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस लव जिहादचे समर्थन करते का? तसेच चित्रपटावर कोणीही बंदी घातली तरी आपण हा चित्रपट पुन्हा एकदा पाहणार आहोत - भाजप नेते किरीट सोमय्या


पुन्हा केरला स्टोरी सिनेमा पाहणार: दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी द केरला स्टोरी या चित्रपटावर बंदी घातली आहे. ममता बॅनर्जी यांच्या या कृतीचा आपण निश्चित करतो आणि आज पुन्हा एकदा घाटकोपरच्या द ओरियंट येथे हा सिनेमा पाहणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. तसेच याआधीही राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी 'द केरला स्टोरी' या चित्रपटावरून टीका केली. केरळच्या नावाने प्रदर्शित झालेला चित्रपट हा खोटारडेपणाच्या परमोच्च स्थानावर आहे, असे त्यांनी ट्विट केले होते.

हेही वाचा:

  1. Jitendra Awhad On The Kerala Story द केरळ स्टोरीच्या निर्मात्याला भर चौकात फाशी द्या जितेंद्र आव्हाड
  2. AR Rahman shares true Kerala Story द केरळ स्टोरीचा वाद सुरू असताना एआर रहमानने शेअर केली खऱ्या केरळ स्टोरीची घटना
  3. Owaisi Criticized PM नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत चित्रपटाचे प्रमोटर नाहीत ओवैसींची द केरला स्टोरी चित्रपटावरून टीका

ABOUT THE AUTHOR

...view details