मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे ( CM Uddhav Thackeray Wife Rashmi Thackeray ) यांचे अलिबागमधील कोर्लई या गावी एकोणीस बंगले असल्याचा ( Rashmi Thackeray Banglow in Korlai ) आरोप भाजपकडून वारंवार केला जात आहे. हेच 19 बंगले दाखवून देण्यासाठी आता भाजप नेते किरीट सोमैया अलिबागच्या दिशेने रवाना झाले आहेत. ( Kirit Somaiya in Korlai ) तिथे जाऊन सोमय्या रश्मी ठाकरे व रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांच्या जमिनीची पाहणी करणार आहेत.
माध्यमांशी बोलताना भाजप नेते किरीट सोमैया 'मुख्यमंत्र्यांनी सांगा व माझ्या पत्नीचे बंगले चोरीला गेले'
माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, "माझं मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे. त्यांनी सांगावं माझ्या पत्नीचे एकोणीस बंगले चोरीला गेले आहेत. ज्या सरपंचांनी 2019ला सभेत सांगितलं रश्मी ठाकरे यांचा 2019 च्या जानेवारी महिन्यात अर्ज आला आहे. जमीन माझ्या नावावर झाली. आता घर माझ्या नावावर करा. 2019च्या मे महिन्यात याच सरपंचांनी तो अर्ज मंजूर केला होता. 2019च्याच जून महिन्यात जमिनीसह सर्व घरे रश्मी उद्धव ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांच्या नावावर करण्यात आली."
'ठाकरे कुटुंब ग्रामपंचायतीचा टॅक्स भरतंय'
सोमैया म्हणाले की, "मी अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबाचे आर्थिक संबंध उघड केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ठाकरे कुटुंबाकडून अन्वय नाईक यांच्या नावाने कोर्लई ग्रामपंचायतीचा टॅक्स भरण्यात आला. हे पैसे ठाकरे कुटुंबाच्या बँक अकाऊंटमधून भरण्यात आले आहेत." असा आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे.
हेही वाचा -BMC Notice to Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई महापालिकेची नोटीस
दरम्यान, आज किरीट सोमैया अलिबागच्या कोर्लई गावात जाणार असले तरी कोर्लईच्या सरपंचांनी सोमैयांना गावात प्रवेश देणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. भाजप नेते किरीट सोमैया अलिबाग मधील कोरलाईच्या दिशेने रवाना झाले आहे. शिवसेनेच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करणार, असे सोमैया म्हणाले आहेत. तर सरपंचाने सांगितलं होतं आम्ही बंगले बघितले आहेत.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून -
सोमैयांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले होते, की रश्मी ठाकरेंनी कोर्लई ग्रामपंचातला १९ बंगले त्यांच्या नावावर करण्यासाठी पत्र लिहिले होते. हे पत्रही सोमैय्यांनी ट्विट केले आहे. त्यानंतर सोमैय्यांनी पुन्हा एकदा ट्विट करुन कोर्लई गाव अलिबागला भेट देणार असल्याचे म्हटले आहे. सोमैय्यांच्या या भेटीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.