महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'उद्धव ठाकरे अन् प्रताप सरनाईकांना चोरीचा माल पकडला जाण्याची भीती' - BJP leader kirit somaiya hits out at Pratap Sarnaik

भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमैया यांनी आमदार प्रताप सरनाईक व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली. उद्धव ठाकरे व आमदार प्रताप सरनाईक यांना चोरीचा माल पकडला जाण्याची भीती असल्यामुळे त्यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती, असे ते म्हणाले.

किरीट सोमैया
किरीट सोमैया

By

Published : Dec 9, 2020, 1:32 PM IST

मुंबई - आमदार प्रताप सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. ईडीकडून कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यावरून भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमैया यांनी आमदार प्रताप सरनाईक व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली.

किरीट सोमैया यांची आमदार प्रताप सरनाईक व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका

आमदार प्रताप सरनाईक यांना माहिती आहे की, त्यांची चोरी पकडली जाणार असून त्यांना तरुगांमध्ये जावे लागेल. त्यामुळे उद्धव ठाकरे व आमदार प्रताप सरनाईक यांना चोरीचा माल पकडला जाण्याची भीती असल्यामुळे त्यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून एमएमआरडीएला 175 कोटींचा चुना लावण्यात आलेला असून हा सर्व प्रकार ईडी चौकशीत समोर येईल, असे किरीट सोमैया यांनी म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाकडून जरी कारवाई न करण्याचे निर्देश मिळाले असले, तरी आमदार प्रताप सरनाईक यांना चौकशीला गुरुवारी ईडी कार्यालयात हजर रहावे लागेल, असे भाजपा नेते किरीट सोमैया यांनी म्हटलं.

प्रताप सरनाईकांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा -

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची ईडीकडून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणासंदर्भात चौकशी होणार आहे. यासाठी ईडीकडून सरनाईक यांना समन्स बजावण्यात आले होते. मात्र, आमदार प्रताप सरनाईक सरनाईक यांच्या कडून सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने आमदार प्रताप सरनाईक सरनाईक व कुटुंबीयांच्या विरोधात कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यास सुप्रीम कोर्टाने मनाई केली आहे.

हेही वाचा -सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये आज होणारी बैठक रद्द, शहांचा प्रयत्न असफल

ABOUT THE AUTHOR

...view details