मुंबई -महापालिकेने कंगना रणौत यांच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईविरुद्धच्या याचिकेवर आज 27 नोव्हेंबरला मुंबई उच्च न्यायालय निकाल दिला आहे. अभिनेत्री कंगना राणौतला नुकसानभरपाई देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. यानंतर भाजपा नेते किरीट सोमैया यांनी महानगरपालिकेवर जोरदार टीका केली आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि महापौरांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सुरुवातीपासूनच भाजपाने कंगनाला पाठिंबा दिला होता. आता उच्च न्यायालयाने कंगनाच्या बाजूने निर्णय दिल्याने भाजपाने त्याचे स्वागत केले आहे. सोमैया यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला आहे. न्यायालयाच्या निर्णयाने राऊत यांची बोलती बंद झाली आहे, असे सोमैया म्हणाले.
अतुल भातखळकरांचाही सरकारवर निशाणा -