महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Live : एकनाथ खडसे यांची भाजपला सोडचिठ्ठी... वाचा लाइव्ह अपडेट्स - एकनाथ खडसे यांचा राष्ट्र्वादीत प्रवेश

एकनाथ खडसे
एकनाथ खडसे

By

Published : Oct 21, 2020, 2:28 PM IST

Updated : Oct 21, 2020, 8:11 PM IST

15:02 October 21

माझा आणि त्यांचा चांगल्या प्रकारे संवाद असल्यामुळे त्यांच्याशी चर्चा करत होतो. एकत्र बसू, असे ते वारंवार म्हणत होतो. चर्चेद्वारे मार्ग काढण्याचे प्रयत्न करत होतो. काही प्रयत्न असतात, ते अपयशी ठरतात -चंद्रकांत पाटील 

15:01 October 21

त्यांनाच विचारावं लागेल की, राजीनामा का दिला. मी त्यांना वारंवार सांगत होतो. एकत्र बसू त्यावर पडदा पाडू. फडणवीसांशी बोलू. पण याबाबत काही झाले नाही - चंद्रकांत पाटील 

15:01 October 21

कितीही रागवले तरी नाथाभाऊ हे पाऊल उचलतील वाटलं नव्हतं. पण कोणती गोष्ट ठरलेली असते, टाळू शकत नाही. त्यांनी पक्षात राहावं नेतृत्व करावं, अशी आमची इच्छा होती. त्यांनी तिकडे जाऊन चांगलं काम करावं, त्यांना माझ्या शुभेच्छा.

14:51 October 21

त्यांच्या राजीनाम्याचे कटूसत्य आम्ही स्वीकारणार..

खडसेंसोबत 1980 पासून माझा परिचय आहे. फडणवीसांनी खडसेंच्या सर्व शंकाचे खंडन केले होते. नाथाभाऊच्या जाण्याने भाजपाचे नुकसानच.

14:49 October 21

खडसेंना भाजपाच्या शुभेच्छा...

खडसेंना आमच्या शुभेच्छा, नाथाभाऊनी चांगल काम करावं.  खडसेंना रोखण्याचा प्रयत्न केला, शेवटपर्यंत मनधरणीचे प्रयत्न सुरू होते, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. त्यांच्या जाण्याने पक्षांच नुकसान झालयं, असं ते म्हणाले.

14:40 October 21

एकनाथ खडसेंनी भाजपला राजीनामा पाठवला ..

एकनाथ खडसे यांनी भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राजीनामा पाठवला. मी वैयक्तिक कारणास्तवभाजपच्या प्राथमिक सदस्यतेचा राजीनामा देत आहे, असे राजीनाम्यात म्हटले आहे. 

14:27 October 21

उद्या बलात्काराचा आरोप करतील..

 आज विनयभंग उद्या बलात्काराचा आरोप करतील. चंद्रकांत पाटील यांनीच केवळ फोन केला. राष्ट्रवादीने कोणतेही आपेक्षेने जात नाही कोणतेही आश्वासन दिलेले नाही  

14:27 October 21

फडणवीसांनी खालच्या स्तरावर राजकारण केलं.

विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी फडणवीसांनीच सांगितले. एक ही आमदार एकही खासदार माझा बरोबर नाही  खासदार रक्षा ताई यांनी त्यांचा निर्णय घ्यावा, रोहीणी ताईं बाबत निर्णय नाही  पक्ष सोडण्याच्या वेदना आहेत.पण खालच्या स्तरावर राजकारण गेलं असेल, तर अशा व्यक्ती बरोबर काम करण्यात रस नाही.

14:26 October 21

केंद्रीय नेत्यांवर आक्षेप नाही..

केंद्रीय नेत्यांवर कोणताही आक्षेप नाही. ठरवून आपल्यावर फडणवीसांनी गुन्हे दाखल केले. मोठा मानसिक त्रास गेली ४ वर्ष मानसिक त्रास सहन केला. राजकीय जिवनात कोणीही आरोप केले नाहीत, मात्र, फडणवीसांनी जीवन उध्वस्त करण्याचा  प्रयत्न केला.

14:26 October 21

देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच भाजप सोडलं

भाजपच्या आत्ताच्या नेत्यांचे काय योगदान आहे . आत्ता आले आणि लगेच पदं दिली . 40 वर्ष पक्षासाठी खर्च केले. आत्ता पर्यंत राजकिय जिवनात एकही आरोप केला नाही.  देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच भाजप सोडत आहे.  

14:14 October 21

एकनाथ खडसे यांची भाजपला सोडचिठ्ठी... वाचा लाइव्ह अपडेट्स

जळगाव - गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते तथा माजीमंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आहे. आता या चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे यांनी आपल्या भाजप सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाकडे दिल्याची माहिती समोर येत आहे. आता ते येत्या शुक्रवारी (23 ऑक्टोबर) राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषेदत दिली. मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा होणार असल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वी खडसेंनी राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींकडून आपल्या राजकीय पुनर्वसनासाठी एक 'फॉर्म्युला' ठरवून घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपकडून सातत्याने अन्याय होत असल्याने एकनाथ खडसे हे पक्षांतराच्या निर्णयापर्यंत आले आहेत.  

Last Updated : Oct 21, 2020, 8:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details